कळवण तालुक्यांमध्ये सर्रासपणे अवैध गोवंश वाहतूक सुरू होती. गोवंश संरक्षक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत गोवंश तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली होती. जनावरांच्या सदर अवैध वाहतुकीला आळा बसण्यासंदर्भातचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अभोणा शहरात एका पिकअप वाहनात चार गुरे भरुन ठेवली असल्याची कुणकुण काही सामाजिक कार्यकर्त्यांना लागली. त्यांनी व ग्रामस्थांनी सदर बाब पोलिसांना सांगितल्यानंतर अभोणा पोलिसांनी भरदिवसा पिक अप (क्र. एमएच ०४ इएल ११४३) या वाहनासह चार गुरे तसेच ती घेऊन जाणाऱ्या सरफराज शेख (रा. अभोणा) या संशयितास ताब्यात घेतले आहे.
यावेळी फिर्यादी कळवण तालुका भाजपा सरचिटणीस कृष्णकुमार कामळस्कर, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष सागर जाधव, गोरक्षक परेश दुसाने, विजय चव्हाण, पोलीस ठाणे शांतता समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
इन्फो...
आदेश देऊनही दिरंगाई
अभोणा मध्यवर्ती ठिकाणी पीकअप मध्ये गुरे असल्याची माहिती अभोणा पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर कारवाईसाठी आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी योग्य ती कारवाईचे आदेश दिले. मात्र वाहन रिकामे करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. ग्रामस्थांनी याबाबत निषेध व्यक्त करीत तक्रार केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. दरम्यान, अभोणा पोलीस हद्दीतील गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.
180921\18nsk_51_18092021_13.jpg
ताब्यात घेतलेले वाहन