शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कोट्यवधींना गंडविणारा विनोद पाटीलला अटक

By admin | Updated: March 16, 2017 19:12 IST

कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालक विनोद पाटील मागील सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत होता.

नाशिक : कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालक विनोद पाटील मागील सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत होता. अखेर आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या खेरवाडी परिसरात जाऊन पाटीलच्या मुसक्या आवळल्या. मुख्य संचालक संशयित आरोपी विनोद पाटील याने सुमारे चार वर्षांपूर्वी हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटची स्थापना केली होती. तीस एजंट्समार्फत २० गुंतवणूकदारांकडून ५० हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेची गुंतवणूक केली आहे़ पाटील याने गुंतवणूकदारांची रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतविली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाटील यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांची व्याप्ती वाढली असून, फसवणुकीचा आकडा ५.४९ कोटीवर पोहचला आहे. हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या एकूण पाच संचालकांना पोलिसांनी सहा महिन्यांपुर्वीच अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश गुरुनाथ देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीचे संचालक संशयित विनोद बाळू पाटील (रा. नवीन नाशिक), सुशांत रमेश कोेठुळे (रा. तपोवन), भगवंत शिवाजी कोठुळे, महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), अनिल निवृत्ती कोठुळे (नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), विकास सर्जेराव खंदळे, दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), सतीश शेषराव कामे (रा. नवीन नाशिक), विजय लक्ष्मण खुणकर, सुरेखा भगवंत कोठुळे या अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१२ सालापासून तर अद्याप पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाउस आॅफ बुलियन्स, हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट, हाउस आॅफ बिल्डकॉन, हाउस आॅफ अ‍ॅग्रो कम्युनिटी यांसह इतर कंपन्यांच्या माध्यमातून आपापसात संगनमत करत कटकारस्थान रचत अधिकृत एजंट असल्याचे सांगून ठेवीच्या रकमेवर दरमहा व्याज स्वरूपात काही कालावधीपर्यंत परतावा दिला आणि विश्वास संपादन करून घेत त्यानंतर परतावा देणे बंद केले. करारानुसार रकमेची मागणी केली असता रक्कम देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आर्थिक फसवणूक झाल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. विनोद पाटील हा सातत्याने पोलिसांबरोबर लपंडाव खेळत होता. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांच्या पथकाने खेरवाडी गाठले. पाटील याच्या मुसक्या आवळून त्याला नाशिकमध्ये आणले. जिल्हा न्यायालयापुढे संशयित पाटील यास हजर केले असता न्यायालयाने त्यास येत्या गुरूवारपर्यंत (दि.२३) पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांच्या वतीने सरकारी वकील अजय मिसर व जयदीप वैशंपायन यांनी कामकाज चालविले.मुख्य संचालक संशयित आरोपी विनोद पाटील याने सुमारे चार वर्षांपूर्वी हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटची स्थापना केली होती. तीस एजंट्समार्फत २० गुंतवणूकदारांकडून ५० हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेची गुंतवणूक केली आहे़ पाटील याने गुंतवणूकदारांची रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतविली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाटील यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांची व्याप्ती वाढली असून, फसवणुकीचा आकडा ५.४९ कोटीवर पोहचला आहे.