शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या भावांमध्ये रंगतेय लढत

By admin | Updated: May 15, 2017 00:31 IST

हाडाच्या राजकारणापायी सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात उतरून एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रत्यय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो व कोणी कोणाचा शत्रू नसतो याचा प्रत्यय कमी अधिक प्रमाणात राजकारण्यांना येत असतो; मात्र हाडाच्या राजकारणापायी सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात उतरून एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रत्यय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. माजी महापौर दिवंगत निहाल अहमद व विद्यमान उपमहापौर युनुस ईसा यांचे सुपुत्र आमने-सामने लढत आहेत.महापालिकेच्या रणांगणात सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात राजकीय घराणेही अपवाद राहिले नाही. महापालिकेतील संख्याबळ वाढविण्यासाठी एकाच कुटुंबातील व नातेवाइकांनी पक्षाची अधिकृतरीत्या उमेदवारी बहाल करण्याची किमयाही पक्षश्रेष्ठींनी दाखवून दिली आहे. नाते-गोते बघून उमेदवारी देण्यात आली आहे. राजकारणात प्रत्येकाला हितशत्रू असतात; मात्र सत्तेसाठी सख्ख्या भावांमध्येच लढत होणार आहे. मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२च्या (ड) अ जागेसाठी माजी दिवंगत मंत्री निहाल अहमद यांचे पुत्र नगरसेवक बुलंद एकबाल हे जनता दलाकडून उमेदवारी करीत आहेत. तर त्यांच्यासमोर त्यांचेच बंधू अन्सारी इश्तियाक अहमद निहाल अहमद हे समाजवादी पार्टीकडून उभे आहेत. महापालिकेच्या राजकारणात कायम दबदबा असलेले व ज्येष्ठ नगरसेवक विद्यमान उपमहापौर युनुस ईसा यांचे पुत्र शेख माजीद मो. युनुस हे एमआयएमकडून उमेदवारी करीत आहेत. तर त्यांना त्यांचे बंधू शेख खालीद परवेझ मो. युनुस यांनी अपक्ष उमेदवारी करून आव्हान उभे केले आहे. या सख्ख्या भावांमध्ये होणाऱ्या लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.राजकारणाचा मोठा वारसा लाभलेल्या या कुटुंबामध्ये सत्तेसाठी आता घरातच संघर्ष सुरू झाला आहे. दीर्घकाळ सत्तेची सूत्रे असूनही सत्तेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महापालिकेच्या राजकारणात कमी-अधिक प्रमाणात अशा घटना घडल्या असल्या तरी यंदाच्या निवडणुकीत चारही तरुण उमेदवार समोरासमोर लढत देत आहेत.