शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रात्रपाळीची साफसफाई बंद करण्यास तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:21 IST

महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीने त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.

नाशिक : महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीने त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे, मनपाच्या आरोग्य विभागामार्फत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांकडून पाच हजार रुपये वेतनावर रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. मात्र, हीच कामे ठेकेदारांकडून करून घेतल्यास त्यांच्या कामगारांना किमान वेतनानुसार सुमारे १५ हजार रुपये मोजावे लागतील. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा ताण पडेल. मनपातील काही लोक ठेकेदारांना लाभ होण्यासाठी मनपाचे आर्थिक नुकसान करत आहेत. महापालिकेत कामगारांची संख्या अपुरी असल्याने प्रशासनाकडून सोयीनुसार रात्रपाळीत काम करून घेतले जात आहे. त्यात आणखी भर घालण्याऐवजी काही लोकांना ठेका देण्यासाठी मनपाच्या कर्मचाºयांमार्फत होणारी रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यास समितीचा तीव्र विरोध आहे. आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरतीला समितीने यापूर्वीही कडाडून विरोध दर्शविलेला आहे. सफाई कामगारांच्या भरतीसंबंधीचा प्रस्ताव महासभेने मंजूर करूनही तो शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. शासनाने मनपाकडून अभिप्राय मागविला आहे, परंतु सदर अभिप्राय अद्याप पाठविण्यात आला नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सुरेश दलोड, सुरेश मारू, रणजित कल्याणी, ताराचंद पवार, रमेश मकवाना, अनिल बेग आदी उपस्थित होते.