शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक तपापासून ‘तो’ करतोय भटक्या श्वान अन‌् मांजरींचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:17 IST

जागतिक मांजर दिन --- नाशिक : कुत्रे अन‌् मांजर एकमेकांचे कट्टर वैरी असल्याचे जगजाहीर आहे. या दोन्ही वेगळ्या कुळाचे ...

जागतिक मांजर दिन

---

नाशिक : कुत्रे अन‌् मांजर एकमेकांचे कट्टर वैरी असल्याचे जगजाहीर आहे. या दोन्ही वेगळ्या कुळाचे प्राणी एकत्र गुण्यागोविंदाने राहत सोबत जेवण करत असतील, अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र, रामवाडीतील तळेनगर भागातील एका घरात हा अपवाद बघावयास मिळतो. एकाच छताखाली श्वान व मांजरींचा गलका नजरेस पडतो. एक तपापासून भटक्या श्वान अन‌् मांजरींच्या संगोपनाचे व्रत निष्ठेने जोपासणाऱ्या राजू कुमावत यांच्या घरी बागडणाऱ्या मांजरी व श्वानांची पक्की दोस्ती बघणारा अवाक‌् होतो.

मांजरप्रेम हे बहुतांश कुटुंबीयांमध्ये पाहावयास मिळते. शहरात असे बहुसंख्य मांजरप्रेमी असून त्यांच्याकडून पर्शियन प्रजातीच्या मांजरींचा जिवापाड सांभाळ केला जातो. तसेच देशी मांजरीदेखील अनेकांच्या घरातील अघोषित सदस्य बनल्याचे सभोवताली दिसून येते. तळेनगरमध्ये राहणारे राजू हे जुन्या लाकडी वस्तूंच्या खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना मुक्या प्राण्यांविषयी कमालीची आस्था आहे. परिसरात कोठेही जखमी मांजर किंवा श्वान असल्याची माहिती मिळताच ते धावून जातात. त्यांना ‘रेस्क्यू’ करत घरी आणून औषधोपचार करून हा अवलिया कायमस्वरूपी या मुक्या जिवांचे पालकत्व स्वीकारताना दिसून येतो. त्यांनी गेल्या बारा वर्षांमध्ये अशा बहुसंख्य मांजरी व श्वानांना जीवदान दिले आहे. कर्करोग, पक्षाघातासारख्या दुर्धर आजारांमधून काही मांजरींसह श्वानांची सुटका केल्याचे ते सांगतात.

---इन्फो---

कुटुंबीयांचाही मांजरी अन‌् श्वानांना तितकाच लळा

कुमावत यांना जितका मांजरी व श्वानांचा लळा आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक लळा त्यांच्यासोबत वावरणाऱ्या मांजरी व श्वानांनाही कुमावत कुटुंबाचा लागलेला दिसून येतो. अत्यंत मैत्रीपूर्ण नाते या घरातील माणसे व प्राण्यांमध्ये दिसून येते. श्वान मांजरीवर भुंकत नाही की, मांजरी श्वानांवर गुरगुरत नाहीत, असे अनोखे दृश्य प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणारे आहे.

---इन्फो--

महापुराने शंभर मांजरींना हिरावून नेले

२०१९ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीसह नाल्यांना आलेल्या महापुरात कुमावत यांचे घर पाण्याखाली गेले होते. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह सुमारे शंभरपेक्षा अधिक मांजरी वाहून गेल्या. काही मांजरींना वाचविण्यास त्यांना यश आले. मात्र, पुराच्या पाण्याच्या प्रकोपापुढे त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि शंभराहून अधिक मांजरींना या नैसर्गिक आपत्तीने कायमचे या प्राणीप्रेमीपासून हिरावून नेले. त्या आठवणीने आजही कुमावत यांच्या अंगाला शहारे येतात.

--

कोट

एका अपघातातून जीवदान मिळाले. दोन्ही पायांनी अधू झालो होतो. तेव्हापासून श्वान व मांजरींचा लळा लागला. गेली बारा वर्षे झाली मी या मुक्या प्राण्यांची सेवा करत आहे. त्यांच्या सेवेमुळेच मी आज सुखी जीवन जगत आहे. महापुरात माझ्या शंभर मांजरी वाहून गेल्या. आयुष्यात माझी सर्वांत मोठी संपत्ती या रूपाने मी गमावली. मुक्या प्राण्यांवर माणसाने दया करावी. जगा आणि जगू द्या, इतकेच मी सांगू इच्छितो.

-राजू कुमावत, प्राणीप्रेमी

----

फोटो क्र : २८पीएचएफबी९७ /