शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि ...

नाशिक : गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि नंतर अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. मात्र, आदिवासी भागासह अन्य कारणांमुळे कुपोषित बालकांमध्ये गोवरच्या अनेक दुष्परिणामांसह जिवाचा धोकादेखील संभवतो.

पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरूपात येत असे. आता गोवर लसीमुळे साथ कमी झाली आहे. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो; पण तो उशिराही येऊ शकतो. गोवर एकदा येऊन गेला, की जवळजवळ आयुष्यभर गोवरविरुध्द टिकणारी प्रतिकारशक्ती देऊन जातो. म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला नसेल तर आयुष्यात कधीही तो होऊ शकतो. गोवर उशिराच्या वयात येणे जास्त त्रासदायक असते. मात्र, आता सुदैवाने गोवरविरुध्द परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. काही पालक मुलाला पूर्वी एकदा गोवर होऊनही काही मुलांना पुन्हा ‘गोवर’ निघाला असे सांगतात. बहुधा हे आजार गोवरसदृश इतर विषाणूंमुळे असतात.

इन्फो

गोवर होण्याचे कारण

गोवर हा रोग विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर आपल्यासारख्या उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही; पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळ्यात हा आजार जास्त बळावतो. गोवरचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणुप्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवरचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकेच्या आतल्या भागात होतो. म्हणूनच गोवरमध्ये खोकला येतो. बऱ्याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणाऱ्या सुजेमुळे उठतात.

इन्फो

गोवरचे रोगनिदान

शरीरात एकदा विषाणूचा प्रवेश झाला की ८ ते १२ दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला आदी त्रास जाणवतो.

या काळात मोहरीएवढे लालसर ठिपके तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके म्हणजे गोवरची हमखास आढळणारी खूण आहे. पण एक-दोन दिवसांत हे ठिपके जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर मात्र गोवर आहे हे निश्चित होते.

इन्फो

...तर डॉक्टरांना दाखवा

पुरळ ज्या क्रमाने येते त्याच क्रमाने वरून खाली नाहीसे होतात. काही दिवस पुरळांच्या जागी खुणा राहतात. वाढत जाणारा ताप पुरळ उठायचे थांबल्यावर लगेच शमतो. तोंडातील पुरळांमुळे काही खाता येत नाही, भूक मंदावते. सर्वसाधारणपणे पुरळ निघायला सुरुवात झाल्यापासून सहा-सात दिवसांत मूल बरे होते. ताप उतरून नंतर पुन्हा येऊ लागल्यास किंवा पुरळ पायांपर्यंत गेल्यावरही ताप न शमल्यास गोवराच्या दुष्परिणामांची शक्यता वाढू शकते. त्यामुळे आधीच डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरते.