शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खतप्रकल्पामुळे दुर्गंधी

By admin | Updated: April 17, 2017 00:42 IST

मनपाचे दुर्लक्ष : कचऱ्यामुळे श्वास घेण्यास त्रास; नागरिक वैतागले

पाथर्डीफाटा : पाथर्डी शिवारातील खतप्रकल्पाचे खासगीकरण करूनही परिसरातील नागरिकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढलेला दिसून येतो आहे. खतप्रकल्पातून दररोज सकाळी प्रचंड धूर व दुर्गंधी परिसरात लांबवर पसरत असल्याने शेजारील वस्ती, महामार्गावरून जाणारे - प्रवासी व नेहरू उद्यान, पांडवलेणी परिसरातील नागरिकांना श्वास घेताना गुदमरायला होते आहे. मनपा प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवून परिसर धूर व दुर्गंधीमुक्त करावा, अशी मागणी होत आहे.खतप्रकल्पाचे दुखणे मनपाला पेलवले न गेल्याने खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला गेला आहे. आतातरी परिसर समस्यामुक्त होईल असा परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा होत्या. मात्र अलीकडे रोज सकाळी खतप्रकल्पाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे आसमंत व्यापून जातो आहे. कित्येक कि. मी. लांब दाट धुके पसरावे तसा हा धूर पसरतो. पांडवलेणी व नेहरू वनोद्यानातील वन्यजीव पक्षांना या धुराचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. या धूर व दुर्गंधीमुळे पांडवलेणीच्या निसर्गरम्य परिसरात भल्या सकाळी फिरायला, व्यायाम करायला, ट्रेकिंगला येणाऱ्या नाशिकच्या विविध भागांतील नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. श्वास गुदमरत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकल्पाजवळच गौळाणे रोड, वीटभट्टी परिसर, पाथर्डी मळे वस्ती, वाडीचे रान आदी भागांतील नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहे. हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा लागणार, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यावर त्वरित उपाय योजना करण्याची मागणी रवींद्र कदम, बी. व्ही. गायकवाड, सुभाष पवार, माणिक भदाणे, विनायक नवसुपे, सुरेश शिंदे आदींनी केली आहे.