शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या विवाहानंतर पित्याची आत्महत्या

By admin | Updated: May 19, 2017 00:27 IST

नांदगाव : लग्नातील फेट्याने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : आदल्या दिवशी मुलीच्या लग्नात मिळालेला मानाचा फेटाच मानेला गुंडाळून आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव परिसरात घडली. राजेंद्र बाबूराव खेडकर (५०) घाटशीळ, ता. पारेगाव, जि. बीड हे मयत इसमाचे नाव असून, त्यांच्यावर नाशिक येथील मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते.अंगावरची हळद उतरण्याआधी नियतीने घाला घातला. अघटित घडले. नवरी काशीबाईवर विवाहाच्या आनंदावर पहिल्याच दिवशी पित्याच्या मृत्यूची कुऱ्हाड कोसळली. तिचे वडील मयत राजेंद्र खेडकर यांची सासुरवाडी वेहेळगावची असून, मुलगी काशीबाई हिलासुद्धा तिथेच भाबड परिवारात देण्यात आले आहे. त्यानिमित्ताने खेडेकर व आप्तेष्ट एकत्र आलेले होते. काशीबाईचे लग्न मामाच्या गावी वेहेळगावी बुधवारी दुपारी १ वाजता झाले. रात्री सर्व पै पाहुणे गाढ झोपेत असताना पहाटे (गुरु वार) उठून खेडकर घराबाहेर गेले. ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. सकाळी ते घरात नाही हे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली.दरम्यान, सकाळी संतोष गिते यांना मोबाइल आला. त्यावरून एका झाडाला कोणीतरी गळफास घेऊन लटकलेले आहे असे कळाले. त्यांनी लगेच पोलीस हवालदार चौधरी यांना ही खबर दिली. ते ठिकाण शेरेकर यांच्या घरापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असून, बाळू विठ्ठल यांच्या शेतातील ते झाड आहे. चौकशीसाठी गिते यांच्यासह काहीजण तिकडे गेले असता त्यांच्यातील सर्जेराव भाबड यांनी झाडावर लटकलेली व्यक्ती कालच्या लग्नातला पाहुणा आहे, अशी माहिती दिली. अधिक माहितीसाठी नवरी काशीबाई हिच्या मामींना (रत्ना काळू शेरेकर) घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी लटकलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून राजेंद्र खेडकर हेच असल्याचा खुलासा केला.