शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांचे गुपित उघड झाल्याने बापाने आवळला तरुण मुलाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

नाशिक : पित्याच्या विवाहबाह्य संबंधांचे गुपित मुलाला माहीत झाले आणि पित्याने दीड एकर शेती स्वत:च्या प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास ...

नाशिक : पित्याच्या विवाहबाह्य संबंधांचे गुपित मुलाला माहीत झाले आणि पित्याने दीड एकर शेती स्वत:च्या प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने कडाडून विरोधही केला म्हणून मनात राग धरत पोटच्या २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून जन्मदात्या पित्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील जनरल वैद्यनगर परिसरात राहणारे देवळा पशुसंवर्धन दवाखान्यातील पशुवैद्यक संशयित प्रभाकर माळवाड व त्यांचा मुलगा निलेश माळवाड आणि फिर्यादी आई जयश्री यांनी रविवारी (दि.३) रात्री सोबत जेवण केले. यावेळी मुलगा निलेश याने वडिलांना ‘पोल्ट्री फार्म सुरू करून द्या’ असे सांगितले. यावेळी संशयित प्रभाकर यांनी त्याला दम देत ‘तू काही कामाचा नाही, त्यामुळे मी तुला काहीही देणार नाही’ असे सांगत खडसावले. यावेळी दोघा पिता-पुत्रांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. जयश्री यांनी मध्यस्थीने त्यांचे भांडण मिटविले. माळवाड दाम्पत्य त्यांच्या खोलीत झोपले व मुलगा निलेश हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने ‘आई-आई’ असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता प्रभाकर यांनी स्वत:च्या पत्नीला ढकलून देत निलेश प्रभाकर माळवाड (२८) यास गळा दाबून त्यास ठार केल्याचे त्याची आई जयश्री यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रभाकर यास अटक केली असून जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध खुुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

---

आई-वडिलांच्या नात्याची प्रतिमा मलीन

जन्मदात्या पित्याने ‘आज तुला संपवूनच टाकतो’ असे म्हणत मुलगा साखरझोपेत असताना त्याच्या छातीवर बसून गळा आवळून ठार केल्याच्या घटनेने पिता-पुत्राच्या नात्याला काळिमा फासली गेली. काही दिवसांपूर्वीच आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका चिमुकल्याचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली होती. या दोन्ही घटना शहरात लागोपाठ घडल्याने आई-वडिलांच्या नात्याची प्रतिमाही जनमानसात मलीन झाली आहे.