शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नासाकासाठी उपोषण

By admin | Updated: August 27, 2016 00:18 IST

लिलाव होण्याची भीती : सोमवारी मंत्रालयात बैठक

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आल्यामुळे कर्जाच्या खायीत अडकलेला हा कारखाना भविष्यात लिलावाद्वारे विक्री होण्याची भीती व्यक्त करीत कारखान्याचे कर्मचारी, सभासद व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून, कारखाना सुरू राहण्यासाठी काय उपायोजना करता येतील यावर विचार करण्यासाठी सोमवारी मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली आहे. या संदर्भात ज्येष्ठ सभासद पां. भा. करंजकर व साखर कारखाना महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ. भास्करराव गोडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नाशिक जिल्हा बॅँकेकडून कारखान्याने वेळोवेळी कर्ज घेऊन कारखाना उर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला व त्यापोटी कोट्यवधी रुपये व्याजापोटी भरले. आता मात्र बॅँकेने कारखान्याला एनपीएत टाकून कर्ज देण्यास नकार दिला आहे. मुळात २०११-१२ या साली जिल्हा बॅँकेचे ६५ कोटी इतके कर्ज होते व कारखान्याकडे दीड लाख साखरेची पोती शिल्लक होती. खुल्या बाजारात साखर साडेतीन हजार रुपये क्विंटल असताना बॅँकेने बाराशे ते सोळाशे या दराने साखर विक्री केली. ३५ कोटी रुपये किमतीची साखर अवघ्या १८ कोटी रुपयांना विकली गेली. यात भ्रष्टाचार झाला असून, आता कारखान्याला एनपीएत टाकून प्रशासक नेमण्यात आल्याने भविष्यात हा कारखाना लिलावाद्वारे विक्री करून बॅँक आपली रक्कम वसूूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. साडेतीनशे कोटी रुपयांची मालमत्ता कारखान्याकडे असून, ती तारण ठेवून जिल्हा बॅँकेने पुन्हा कर्ज द्यावे, तीन वर्षांपासून कामगारांचे वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी थकली असून, ती त्वरित मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. नाशिक, सिन्नर व इगतपुरी अशा तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना वाचविण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, कर्मचारी, सभासदांच्या आंदोलनाची दखल घेत, सोमवारी सहकारमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविली असून, त्यात काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)