शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:51 IST

येवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले. मात्र गेल्या दोन महिन्यात हे खांब पुन्हा उभे न केल्याने संबंधित खांबावर विहिरीची जोडणी असलेल्या अनिल कदम या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह विद्युत कंपनीच्या येवला कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील नेऊरगावचे शेतकरी अनिल निवृत्ती कदम यांच्या विहिरीवर असलेल्या वीज जोडणीपर्यंत येणारे दोन खांब दि. ११ मे रोजी वादळात पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही विद्युत कंपनी खांब उभारणीसाठी काहीही प्रयत्न करीत नसल्याने कदम यांना मका, डाळींब या पिकांना  पाणी देण्यास बाधा निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीकडे हे खांब उभारणीसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अनिल कदम यांनी निवृत्ती कदम, द्रौपदाबाई कदम, दिलीप कदम, हिराबाई कदम, अर्चना कदम, तेजस कदम, अक्षय कदम, कल्याणी कदम आदिंनी उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.