शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतकऱ्यांची परवड

By admin | Updated: December 19, 2015 22:50 IST

नामपूर : राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीची तक्रार

नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांची वानवा असल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, गटाराची व्यवस्था नसल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अ‍ॅड. रेखा शिंदे यांनी केली आहे. मार्च २०१५ मध्ये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर येथे स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आली. प्रशासकीय राजवट आहे. नामपूर बाजार समितीअंतर्गत कांदा व डाळींब मार्केट जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन समिती प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु शेतकऱ्यांच्या जिवावर कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. कांदा, डाळींब, भुसार मालांच्या विक्रीसाठी शेतकरी समितीत येत असतात. परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. मार्केटच्या आवारात पाण्याची कमतरता असल्यामुळे उघड्यावर मलमूत्र विसर्जनासाठी जावे लागते. पाण्याअभावी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष शीतल कंकरेज, डॉ. भारती कोर, पुष्पावती गोसावी, अलका कापडणीस, पंचशीला खरे, संगीता अहिरराव, शीला गलांडे, वर्षा मुनोत, तसलिमा बोहरी, भूषण निकुंभ, एजाज बोहरी, शब्बीर बोहरी, संदीप राजपुत, डॉ. नितीन कोर, प्रसाद सोनवणे, शिवाजी सोनवणे, पोपट कापडणीस, भुरा गोसावी आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)