शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणला शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST

बागलाणला शेतकऱ्यांचे उपोषण

 सटाणा : बागलाण तालुक्यात यावर्षी प्रारंभापासून अवकाळी पाऊस व गारपिटीने बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. परिणामी तालुक्यातील अनेक शेतकरी आजही पंचनाम्याबरोबरच आर्थिक लाभापासून वंचित आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळावा यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास प्रारंभ केला आहे. बागलाण तालुक्यातील मुंजवाड व खमताणे येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाला प्रारंभ केला आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६३ कोटी रुपयांची शासनाने आर्थिक मदत केलेली असली तरी, कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करताना अत्यंत चुकीचे व दिशाभूल करणारे पंचनामे केले आहेत. नुकसान झालेले व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवून धनदांडग्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल्याचे या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष शेतावर येण्याऐवजी घरी अथवा कार्यालयात बसून पंचनामे दाखविलेले आहेत. परिणामी बाधित शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तालुक्यातील प्रांताधिकारी व तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे पुनश्च पंचनामे करून आर्थिक लाभ मिळवून देत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे. या उपोषणात राहुल सोनवणे, धर्मा नंदळे, शकुंतला बागुल, रामदास बागुल, जयवंत वाघ, अनिल इंगळे, सुशीलाबाई सूर्यवंशी, त्र्यंबक बिरारी, भाऊसाहेब पवार, सतीश सावकार, संजय धाबळे, केदा सोनवणे, नामदेव जाधव, विश्वास सोनवणे, वसंत सावकार, दौलत सावकार, एकनाथ जाधव आदिंसह असंख्य शेतकरी सहभागी आहेत. (वार्ताहर)