शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी केले पेरणी आंदोलन

By admin | Updated: July 30, 2016 00:12 IST

गिसाका : पेरणी करुन केली जमीन परतीची मागणी

 गिसाका : गिसाका स्थापनेसाठी दाभाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. परिसराचा विकास होऊन युवकांना रोजगार उपलब्ध होईल हा हेतू कारखाना उभारण्यामागे होता. मात्र हा कारखाना आर्मस्ट्रॉँग कंपनीने कवडीमोल भावात विकत घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप महाराष्ट्र सहकार बचाव व गिसाका बचाव समितीने केला. यावेळी शेतकऱ्यांनी गिसाकाच्या जमिनीत पेरणी करून आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी आंदोलन केले.महाराष्ट्र सहकार बचाव समितीचे यशवंत अहिरे, प्रा. के. एन. अहिरे, डॉ. सुगन बरंठ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही आदि घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. शिवाजी महाराज व भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रा. के. एन. अहिरे म्हणाले की, आर्मस्ट्रॉँग कंपनीने गिरणा कारखान्याची जमीन तारण ठेवून कर्ज काढले. १२ जानेवारी २०१२ रोजी नाशिक जिल्हा सह. बॅँकेकडून ३० कोटींचा बोजा चढवून १५ कोटींचे कर्ज घेतले. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१४ रोजी नाशिक मर्चंट्स बॅँकेकडे २५ कोटींचा बोजा चढवून साडेबारा कोटी कर्ज घेतले. त्यामुळे या जमिनीवर साडेसत्तावीस कोटींचा बोजा चढविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तरी इडीने त्वरित कार्यवाही करून आर्मस्ट्रॉँग कंपनीकडून घेऊन गिसाका सभासद व शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असेही प्रा. अहिरे म्हणाले. सातबारावर पीकपाणी लावण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी यशवंत अहिरे, दशरथ बाबूराव निकम, देवबा निकम, डॉ. सुगन बरंठ, अरुण पाटील, विशाल निकम यांची भाषणे झाली. ही लढाई दीर्घकाळ चालणारी असल्याने सर्वांनी संघटितपणे लढा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या आंदोलनाप्रसंगी शिवाजी पाटील, उत्तम निकम, उदय हिरे, महेश निकम, पंडित धांडे, बबन कापडणीस, पंडित चव्हाण, सुधाकर निकम, विशाल निकम, दादा पवार, जे. एम. निकम, पुष्पा निकम, दादाजी अहिरे, के. डी. पगारे, सी. बी. शेलार, नानाजी निकम, भगवान अहिरे आदिंसह परिसरातील शेतकरी, सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)