शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सहापट टीडीआरला शेतकऱ्यांची संमती

By admin | Updated: January 14, 2015 23:37 IST

आयुक्तांसमोर सुनावणी : नऊ हरकतदारांची हजेरी; येत्या महासभेत प्रस्ताव मांडणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तपोवन परिसरातील १५७.९० एकर जागेचे साधुग्रामसाठी भूसंपादन करण्यासंदर्भात महापालिकेने जागामालकांना एकास सहा सिंहस्थ टीडीआर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर मागविलेल्या हरकतींवर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी नऊ हरकतदारांनी हजेरी लावत आपली बाजू मांडली असता त्यात आठ जागामालक शेतकऱ्यांनी सहापट सिंहस्थ टीडीआरला संमती दर्शवित १५ मार्चपर्यंत महापालिकेने जागा ताब्यात घेण्याची विनंती केली. सदर सुनावणीबाबतचा प्रस्ताव तयार करून तो येत्या महासभेवर ठेवला जाणार असून, त्यानंतर मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेतील नगररचना विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे यांनी दिली.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील १५७.९० एकर जागेचे कायमस्वरूपी संपादन करण्याचा विषय महासभेवर आला असता महापालिकेने सुरुवातीला एकास दहा सिंहस्थ टीडीआर देण्यास मान्यता दिली होती; परंतु विकास नियंत्रण नियमात बदल करण्याच्या राज्य शासनाच्या निर्देशानंतर दि. १ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या महासभेत पुन्हा एकदा प्रस्ताव मांडण्यात येऊन महासभेने संबंधित जागामालक शेतकऱ्यांना एकास सहा प्रमाणात सिंहस्थ टीडीआर देण्याचा निर्णय घोषित केला होता. याचबरोबर संबंधित शेतकऱ्यांनी टीडीआर घेण्यास नकार दिल्यास त्यांना पैसे देण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची राहील, असेही महासभेने स्पष्ट केले होते. महासभेच्या एकास सहा सिंहस्थ टीडीआर देण्याच्या निर्णयावर महापालिकेने महिनाभराची मुदत देत सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे एकूण १२ सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यावेळी नऊ हरकतदार उपस्थित होते. त्यातील आठ जागामालक शेतकरी होते. या सर्व जागामालकांनी सहापट टीडीआर घेण्यास संमती दर्शविली आणि महापालिकेने १५ मार्चच्या आत जागा ताब्यात घेण्याची सूचना केली. त्याचबरोबर जागा जाणार असल्याने उपजीविकेसाठी मुंबई-आग्रारोड, औरंगाबादरोड याठिकाणी रस्त्यालगत व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि सध्याच्या जागांवर असलेली निवासी घरे ‘जैसे थे’ ठेवत ती आरक्षणातून वगळावी, अशी मागणीही संबंधित शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे केली. हरकतदार अ‍ॅड. पी. बी. लोखंडे यांनी मात्र सहापट टीडीआर देणे योग्य नसल्याची तक्रार केली. आयुक्तांनी हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले.त्यानुसार दि. २० जानेवारी रोजी होणाऱ्या महासभेत सदरचा प्रस्ताव मांडण्यात येणार असून, महासभेच्या मंजुरीनंतर तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याचे नगररचना विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)