शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी कटिबद्ध

By admin | Updated: December 26, 2015 22:16 IST

पंकजा मुंडे : प्रभाग १७ मध्ये विकासकामांचे उद्घाटन

सातपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून राज्य सरकारच्या वतीने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी सातपूर येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठवाड्याच्या तुलनेत नाशिकला पाणी मुबलक आहे. येथील रस्ते आणि विकासाची कामे चांगली असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी जंगलीदास महाराज यांच्या नामकरण सोहळ्यावरून अध्यात्माचे महत्त्व विशद केले. तर महापौर अशोक मुर्तडक यांनी कुंभमेळ्यात महापालिकेचा खूप निधी खर्च झाला आहे, त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून, निधीअभावी विकासकामे रखडली आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेले पैसे मिळण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी यावेळी केली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून प्रभागात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्मार्ट प्रभागासाठी मी कटिबद्ध असेल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेते सलीम शेख, प्रभाग सभापती उषा शेळके, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, तसेच भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील बागुल आदिंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक लता पाटील व अमोल पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)