शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे-वनतळ्यांची तपासणी

By admin | Updated: June 12, 2015 23:56 IST

हरिश्चंद्र चव्हाण यांचे आदेश : दुबार घरकुलांच्या लाभाचीही चौकशी

नाशिक : स्थानिक स्तर विभागामार्फत बांधण्यात आलेल्या शेततळे व वनतळ्यांची विशेष भरारी पथकामार्फत अचानक तपासणी करण्याचे आदेश जिल्हा दक्षता नियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रशासनाला दिले, तसेच दुबार घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचेही आदेश दिले.श्ुक्रवारी (दि. १२) जिल्हा दक्षता नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी खरडपट्टी काढली. लोकप्रतिनिधींचे फोन कमीत कमी घेत जा. तोंडावर सिंहस्थ येऊन ठेपलाय. काही गंभीर प्रसंग ओढवला तरी तुम्ही मी बैठकीत आहे असे उत्तर देता कामा नये, या शब्दांत डॉ. माले यांची खासदार चव्हाण यांनी खरडपट्टी काढली. वन विभागाबाबत आढाव्यात अधिकारीच नसल्याने काय आढावा घ्यायचा, प्रतिनिधी म्हणून जे अधिकारी येतात त्यांनाही काही माहिती नसते त्यांनी बैठकांना तरी का यावे, असे खासदार चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. खासदार सुभाष भामरे यांनी बैठक चार-चार तास सुरू असल्याने दोन टप्प्यात ही बैठक घेण्यात यावी. तीन महिन्यांत एक बैठक घेण्यापेक्षा दीड महिन्यातून बैठक घ्यावी, अशा सूचना केल्या. तसेच गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.  आमदार डॉ. राहुल अहेर यांनी सांगितले की, वनतळे मंजूर होतात, परंतु ते झालेले नाही. पूर्व व पश्चिम विभागाकडील मंजूर वनतळ्यांची यादी द्या, अशी मागणी केली. यावेळी जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार दीपिका चव्हाण, पंचायत समिती सभापती मंदाकिनी निकम, जयंत वाघ, सुभाष कराड, अनिता जाधव, कमल सोनवणे, धर्मराज पवार, कमल सोनवणे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक अरविंद मोरे, साहेबराव पाटील, ललित चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)