शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठीच शेतकरी उत्पादक कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

मालेगाव : शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला असून याच माध्यमातून शेतकऱ्यांचे हित ...

मालेगाव : शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला असून याच माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित आढावा सभेत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी रफिक नायकवडी, सुधाकर बोराळे, डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र निकम, बारीपाड्याचे सरपंच चैत्राम पवार, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ‍ शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, रामा मिस्तरी, प्रमोद निकम, नीळकंठ निकम, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी किरण शिंदे उपस्थित होते.

शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करताना मंत्री भुसे म्हणाले, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना समोर ठेवून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून कृषी योजनांचा लाभ घ्यावा. मनरेगांतर्गत फळबाग लागवडीत राज्याने ३८ हजार हेक्टरचा उच्चांक गाठला. गतवर्षी ५०० रोपवाटिकांचा लक्षांक पूर्ण करून यंदा तो एक हजाराचा देण्यात आल्यामुळे बळीराजाला यातून नक्कीच दिलासा मिळेल.

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविणार

काष्टी परिसरातील-२५० हेक्टर क्षेत्रावर कृषी विज्ञान संकुल साकारण्यात येत असल्याची माहिती डॉ. प्रकाश पवार यांनी दिली. डॉ. पवार म्हणाले, हे कृषी विज्ञान संकुलामार्फत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवून दिलासा देण्याचे काम करतील. प्रत्येक शेतकऱ्याची डीबीटी पोर्टलवर नोंदणी गरजेची आहे. यापुढे एक पानी अर्जाद्वारे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून प्रत्येक शेतकऱ्याने डीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी.

जल जंगल व जमिनीचे संवर्धन ही काळाजी गरज

सेंद्रिय शेतीला चालना देताना जल, जंगल व जमिनीचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत बारीपाड्याचे सरपंच चैत्राम पवार यांनी व्यक्त केले. वन, कृषी व आदिवासी विकास विभागांच्या समन्वयाने ग्रामीण भागातील विकास शक्य आहे. वन धन विकास कार्यक्रमात वनभाज्यांचे सोलर ड्रायरच्या माध्यमातून संवर्धन करून त्याचा राज्यभरात पुरवठा करता येईल, असेही पवार यांनी नमूद केले.