शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ओझर परिसरातील शेतीचे नुकसान

By admin | Updated: August 5, 2016 00:37 IST

ओझर परिसरातील शेतीचे नुकसान

ओझर परिसरातील शेतीचे नुकसानओझर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बाणगंगा नदीला पूर आल्याने नागरिकांचे ेप्रचंड नुकसान झाले. पावसाने बुधवारी थोडीफार विश्रांती घेतली. पूर ओसरत गेला तसे नुकसानीचे चित्र स्पष्ट होत गेले आणि खरी परिस्थिती समोर आली.ओझरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुरात वाहून गेल्याने ओझरकरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यंत्रणा कामाला लागली आहे.चांदोरी परिसरात तर अजून पूर ओसरत असून मोबाइल सेवा ठप्प होती. पोलिसांनी पुढील धोका लक्षात घेऊन सायरन वाजवत लोकांचे स्थलांतर केले. तेथे गुरुवारी आमदार अनिल कदम यांनी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पुराचा दौरा केला असून संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.ओझर येथे पुलाजवळ असलेल्या वस्तीत प्रचंड गाळ साचला आहे. आणि कचऱ्याचे ढीग उपसण्याचे काम सुरू आहे.येथील दुर्योधन कुरेराव व सागर पवार यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. जेसीबीच्या साहाय्याने गाळ, चिखल काढला जात आहे. अनिल सोमासे यांचे शेतीत तर संपूर्ण कचऱ्याचा ढीग आहे. अनुसया पार्क येथे छातीएवढे पाणी शिरले होते. तिन्ही पुलांमध्ये कचरा अडकून कठडे वाहून गेल्याने पूल धोकादायक बनले आहे. बीएसएनएलची मुख्य केबल तुटल्याने येथील ब्रॉड बँड सेवा पूर्ण ठप्प आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सेवा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जुन्या सायखेडा रस्त्यावरची डीपी पाण्याखाली गेल्याने लोकांची रात्र अंधारात गेली. पूर ओसरल्यानंतर वीजप्रवाह पूर्ववत करण्यात आला.पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून ग्रामस्थांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम केले. प्रचंड मोठा पूर येऊनही पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परता दाखविल्यामुळे मोठी हानी झाली नाही. गावातील पाणीपुरवठा सुरू व्हायला काही दिवसांचा अवधी लागेल. (वार्ताहर)