शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कांद्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:31 IST

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

सायखेडा : (बाजीराव कमानकर ) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करत असतात मात्र चाळीमध्ये जागा नसल्याने उरलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. उन्हाळ कांदा अवघा ४०० ते ६०० रु पये भावाने व्यापारी खरेदी करतात इतक्या कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़ महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. बियाणे, रोप तयार करणे, शेतीची मशागत करणे, खते देणे औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. शिवाय शेतकºयांना चार महिने पाणी द्यावे लागते, इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल भावाने विक्री होत असल्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.कांदा शेतकºयांना अनेकदा रडायला लावतो. यंदा मात्र कोरोना रोगाचे संकट त्यात कोसळणारे भाव यामुळे शेतकरी मोठा अडचणी सापडला आहेशेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ झाली की निर्यातबंदी,शासन नियमात बदल, आंदोलन, संप अशा विविध अडचणीत हमखास येतात़-----------------------------क्विंटलला ५०० ते ६०० रुपये दरनिफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहातील; मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.-------------------------ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते त्यामुळे उत्पादक घटले एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाले. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक रहातील मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही.- चंद्रकांत रायते, शेतकरी, शिंगवे-----------------------कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधन यामुळे कांद्याचा बाजारभावात चढउतार होत असतो. सद्या कोरोनामुळे वाहतूक अडचणी वाढल्या आहे. शेतकºयांना चार पैसे मिळाले तर त्यात व्यापाºयालासुद्धा मिळतात त्यामुळे चार पैसे मिळून शेतकरी समाधानी राहावा, असा विचार व्यापारीवर्गाचा असतो; पण वेगवेगळ्या कारणामुळे बाजारभाव पडतात त्याचा फटका शेतकºयांना आणि व्यापारी या दोघांना बसतो. - अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा

टॅग्स :Nashikनाशिक