शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही अपयश

By admin | Updated: August 3, 2015 22:55 IST

कृ त्रिम पाऊस : दहा दिवसांनंतर पुन्हा करणार प्रयत्न

येवला : कृत्रिम पाऊस पडण्याची उत्सुकता शिगेला असताना जड पावलांनी रविवारी माघारी परतलेल्या टीमने सोमवारी सकाळी ७ वाजेपासून अथक परिश्रम घेत ठरावीक वेळेच्या अंतराने उडविलेल्या सात ग्यान रॉकेट्सपैकी केवळ एकाने लक्ष गाठले मात्र तेही कृत्रिम पाऊस पाडण्यास अयशस्वी ठरले. सहा रॉकेट्स फुसके ठरले.सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येवला तालुक्यात मान्सूनचे आगमन होऊनही पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडिज या संस्थेने दाखवून रविवारी दिवसभर कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले; मात्र अपेक्षित वातावरण तयार न झाल्याने रविवारी रॉकेट्स उडविली गेली नाही. परिणामी जमलेल्या हजारो ग्रामस्थांची निराशा झाली. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पुन्हा या पथकाने प्रयत्न केले. कृत्रिम पाऊस पडण्यासाठी ७० टक्के पेक्षा अधिक आर्द्रता व काळे ढग वातावरणात होते. या परिस्थितीत साखर हे इंधन वापरून मोटारच्या सहाय्याने रॉकेट उडवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पहिले रॉकेट सकाळी ७ वाजता उडवले गेले. परंतु हा फुसका बार ठरला. हे रॉकेट दिशाहीन होऊन मीडिया टीमच्या डोक्यावरून निघून गेले. १५ मिनिटांच्या अंतराने दुसऱ्या रॉकेटने आकाशात उड्डाण केले. हे उड्डाण यशस्वी झाले असले तरी ढग विखुरले गेल्याने कृत्रिम पाऊस पडलाच नाही. नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडिज या पथकाचे प्रमुख अब्दुल रहेमान वान्नो व टीमने हार न मानता सलग पाच रॉकेट आकाशात सोडण्याचा प्रयत्न केला. या पैकी दोन रॉकेटनी जागेवरच धूर सोडला. एक रॉकेट २०० मीटर आकाशात झेपवून पुन्हा जमिनीवर कोसळले. ते दोन फूट जमिनीत रुतले. बघ्याची गर्दी कमी असल्याने अनर्थ टळला. एका रॉकेटने तर रिमोट चालवण्यापूर्वीच पेट घेतला. आता औरंगाबाद येथे अमेरिकेच्या रडार यंत्रणेचा वापर करून औरंगाबाद परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याने शेतकऱ्यांचे त्या प्रयोगाकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)