शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लावणीच्या फडावर तिसऱ्या डोळ्याची नजर

By admin | Updated: May 11, 2017 02:37 IST

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरात ‘लावणी’च्या कार्यक्रमांमध्ये अतिउत्साही प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी आयोजकांकडून चित्रीकरण केले जात आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरात ‘लावणी’च्या कार्यक्रमांमध्ये यापूर्वी झालेला गोंधळ लक्षात घेऊन अतिउत्साही प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी आयोजकांकडून प्रेक्षागृहाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात बुधवारी (दि. १०) पहिल्यांदाच झालेल्या लावणीच्या फडात शिट्ट्या अन् टाळ्यांशिवाय प्रेक्षकांची ‘रसिक’ता उफाळून आली नाही. महाकवी कालिदास कलामंदिरात यापूर्वी दर बुधवारी लावणीचे कार्यक्रम व्हायचे. परंतु, या कार्यक्रमांत अतिउत्साही प्रेक्षकांकडून गोंधळ घालण्याचे प्रकार घडायचे. लावणी कलाकारांकडूनही लावणीच्या नावाखाली तोकड्या कपड्यांमध्ये आयटम सॉँग सादर केले जात असल्याने पे्रक्षक थेट रंगमंचावर धाव घेत नृत्यात सहभागी होत असायचे. शिवाय, प्रेक्षकांकडून खुर्च्यांवर उभे राहून नाचकाम केले जात असल्याने खुर्च्यांची मोडतोड व्हायची. काही प्रेक्षकांकडून कालिदासमध्ये यथेच्छ मद्यपान व धूम्रपानाचाही कार्यक्रम सोबत सुरू असायचा. या साऱ्या प्रकारामुळे कालिदास कलामंदिराची बदनामी होऊ लागली होती. शिवाय, प्रेक्षकांना उत्तेजित करणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याची मागणीही सुजाण रसिकांकडून होऊ लागली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मध्यंतरी लावणीच्या कार्यक्रमांना मनाईच केली होती. दरम्यान, लावणी हा लोककला प्रकार असल्याने त्याचे सादरीकरण त्याच ढंगात व्हायला हवे आणि रंगमंचाचेही पावित्र्य जपले जावे, यासाठी महापालिकेने केवळ पहिल्या सत्रातच लावणीचे कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली. परंतु, त्यासाठी काही अटी-शर्तीही लादल्या. यंदाच्या मोसमात पहिल्यांदा बुधवारी (दि. १०) कालिदासमध्ये लावणीचा शो पार पडला. यावेळी आयोजकांनी कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांवर नजर ठेवण्यासाठी खास व्हिडीओ चित्रीकरणाची व्यवस्था केली. कॅमेरा पूर्णवेळ प्रेक्षकांवर नजर ठेवून असल्याने प्रेक्षकांना केवळ शिट्ट्या आणि टाळ्यांचाच आधार घ्यावा लागला आणि अतिउत्साही प्रेक्षकांनाही आवर घातला गेला. याशिवाय, आयोजकांनी गोंधळ होऊ नये म्हणून प्रेक्षागृहात काही माणसांचीही नेमणूक केली होती.