शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती देण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:15 IST

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षांत दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी ...

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षांत दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्न बँक खात्याची माहिती मागविण्यात आली होती. मात्र नवीन प्रणालीनुसार अनेक शाळांना ही माहिती निर्धारित वेळेत संकेसस्थळावर अपलोड करण्यात अडचणी आल्याने ही माहिती देण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत परीक्षा शुल्कमाफीस पात्र तथा अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये अवेळी पावसामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांनाही राज्य मंडळांने सूचित केले असून याविषयीची सविस्तर माहिती मंडळाच्या ‘फी रिफंड’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थीनिहाय भरून संकेतस्थळ‌ावर सबमिट केल्यानंतर यादीच्या शेवटी देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य यांना स्वाक्षरीसह प्रमाणित करून अपलोड करावे लागणार आहे. त्यानुसार बँक खात्याचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सोमवारपर्यंत (दि. १५) ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्धारीत वेळेत माहिती अपलोड करण्यात अडचणी आल्याच्या तक्रारी अनेक शाळांकडून प्राप्त झाल्याने शिक्षण मंडळाने माहिती सादर करण्यास मुदतवाढ दिली असून वाढीव मूदतीत संबधित सर्व शाळांनी ही माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सर्व विभागीय मंडळांना केल्या आहेत.