शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाला मुदतवाढ

By admin | Updated: August 15, 2014 00:34 IST

पीक कर्जाला मुदतवाढ.पीक कर्जाला मुदतवाढ

सटाणा : शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत सन २०१३-१४ मधील पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांंचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत सरकारने मुदतवाढ दिली आहे.राज्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा बँक व ग्रामीण बँकामार्फत खरीप व रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून जाते. या योजनेंतर्गत दरवर्षी चाळीस हजार कोटी रु पये शेतकऱ्यांना वाटप केले जातात. जे शेतकरी ३० जूनपर्यंत पीक कर्जाची परतफेड करतील त्यांना राज्य सरकार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत तीन टक्के व्याजाची सवलत देते.ही रक्कम राज्य सरकार बँकांना अदा करते. कमी व्याजदरामुळे शेतकरीही मुदतीत कर्ज भरतात व बँकाचीही वसुली होण्यास मदत होते. यंदा मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीव्यवसाय उद्ध्वस्त झाला. त्यामुळे सन २०१३-१४ या वर्षातील ३० जूनपर्यंत कर्ज वसुलीचे प्रमाण कमी आहे. पीककर्जाची वेळेवर परत फेड न झाल्यामुळे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार होता. राज्य सरकारने योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे व्याज सवलतीचा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.