शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावांची प्रांतांकडून पाहणी

By admin | Updated: March 11, 2017 01:15 IST

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे

 मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अजय मोरे यांनी सौंदाणेसह टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून सद्यस्थितीतील उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेतला.टाकळी, नगाव, मांजरे, सोनज, कौळाणे, वऱ्हाणे सौंदाणे आदि गावांसाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्याला १०५ दलघफू पाणी सोडण्याची मागणी कृती समितीकडून करण्यात आली आहे. तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती भरत पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी भेट घेतली. तसेच शुक्रवारी प्रांताधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व प्रांताधिकारी मोरे यांनी प्रशासन पाणी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करीत आहे. प्रशासनाला निर्णय घेण्यास वेळ द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. समितीनेही प्रशासनाला वेळ देण्यास संमती दर्शविली आहे.बैठकीस सभापती पवार यांच्यासह अध्यक्ष पंकज गायकवाड, समाधान शेवाळे, कौतिक सोनवणे, शिवाजी पवार, रमेश बच्छाव, सचिव भरत पवार, नितीन निकम यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)