शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

दाभाडीला सभापतिपदाची अपेक्षा

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

दाभाडीला सभापतिपदाची अपेक्षा

नीलेश शिंपी

दाभाडीमालेगाव पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असताना मालेगावला तब्बल तीन पंचायत समिती सभापती देणाऱ्या दाभाडीला यावेळी पुन्हा शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. यशवंत मानकर यांच्या रूपाने पुन्हा संधी मिळेल का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या सोडतीत मालेगाव पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले. दाभाडी पंचायत समिती गणातील शिवसेनेचे सदस्य अ‍ॅड. यशवंत शिवराम मानकर सभापतिपदासाठी दावेदार असून, परिसरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मालेगाव पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी वंदना पवार व अनिता अहिरे यांना अनुक्रमे सभापती, उपसभापति-पदाची संधी देण्यात आली. आरक्षण सोडतीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे दाभाडीकर जनतेला अ‍ॅड. यशवंत मानकर यांच्या रूपाने सभापतिपदाचे स्वप्न पडू लागले आहे.यापूर्वी मालेगाव पंचायत समिती सभापतिपदावर तालुक्यातील दाभाडीचे अ‍ॅड. लक्ष्मण किसन निकम यांना प्रथम संधी मिळाली. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांच्या पत्नी सौ. रेणुकानानी निकम यांना सभापतिपद देण्यात आले. सात वर्षांनंतर त्यांचे पुत्र शशिकांत निकम यांना सभापतिपदाची संधी मिळाली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर अ‍ॅड. यशवंत मानकर दाभाडी पंचायत समिती गणातून निवडून आले. त्यावेळी सभापतिपद हे महिलांना देण्यात आल्यामुळे अ‍ॅड. मानकरांना सभापतिपद मिळाले नाही.आरक्षण सोडतीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अ‍ॅड. यशवंत मानकर यांना आमदार दादा भुसे हे सभापतिपदाची सधी देतील, अशी चर्चा दाभाडी गणात होते आहे. अ‍ॅड. यशवंत मानकर यांनी दाभाडीचे सरपंचपद भूषविले आहे. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभवदेखील आहे.