शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभात विषारी औषध टाकल्याने खळबळ

By admin | Updated: August 3, 2015 22:36 IST

प्रशासन हादरले : वाजे यांच्यासह अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील तेलमाथा भागातील पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभात अज्ञात समाजकंटकांनी विषारी औषध टाकल्याने खळबळ उडाली. सदर प्रकार निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीतील गटनेते उदय सांगळे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी नमुने तपासणीला पाठवून संपूर्ण जलकुंभ धुवून साफ करण्यात आला आहे. भोजापूर धरणातून मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. दापूर ग्रामपंचायतीने तेलमाथा भागातील सुमारे चारशे लोकवस्तीसाठी ३० हजार लिटरचा जलकुंभ बांधण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमार्फत या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेतूनच सदर जलकुंभ भरला जातो. रविवारी दु. ४ वाजेच्या सुमारास जलकुंभाशेजारील सभामंडपात काही ग्रामस्थ झोपलेले होते. सोमनाथ मधुकर आव्हाड हा जलकुंभातील पाण्याने हात धुवत असताना त्यांना विषारी उग्र वास येऊ लागला. आव्हाड यांनी तातडीने सरपंच सोमनाथ कारभारी आव्हाड यांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. आव्हाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाणीपुरवठा बंद ठेवून पंचायत समिती प्रशासन व आमदार राजाभाऊ वाजे यांना घटनेची माहिती दिली. आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांनी रविवारी सायंकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर पाणी न वापण्याचे आवाहन केले. त्यानंतर सदर जलकुंभाची साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी सकाळी गटविकास अधिकारी धनंजय जगताप, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन म्हस्के, नितीन गोडबोले, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायत प्रशासनाने जलकुंभाची स्वच्छता केली आहे. पाणी नुमने तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (वार्ताहर)