शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’चा दुणावलेला उत्साह विधानसभेत विरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:40 IST

लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही.

लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही. जिल्ह्यात आठ ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी निवडणूक लढविली मात्र त्यापैकी दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांनी १० ते १२ हजारांची मते घेतली पण त्यांचा प्रभाव कुठेही दिसून आला नाही.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वंचित आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याविषयीची जिल्ह्यात चांगली चर्चा होती. विशेषत: आघाडी, युतीकडून संधी हुकलेले अनेक दिग्गज वंचित आघाडीच्या गळाला लागतील अशी शक्यता निर्माण झाली होती. किंबहुना काही नावांची चर्चादेखील पसरविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने ऐनवेळी निवडीची वेळ निघून गेल्याने मागणी केलेल्या उमेदवारांना तिकीट द्यावे लागले आणि जिल्ह्यात केवळ आठच उमेदवार त्यांना उभे करता आले. वास्तविक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याचे पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते; मात्र उमेदवारी जाहीर करताना विजयाचे निकष दुर्लक्षित करून जागा लढविणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आणि वंचित निवडणुकीला सामोरे गेली. प्रचारातील त्यांचा उत्साह मात्र दिसून आला नाही.लोकसभा निवडणुकीत २८ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन देवळालीतून वंचितने चांगले वातावरण निर्माण केले होते; मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यास येथून कुणीच तयार नसल्याने वंचितपूर्ण पेच निर्माण झाला होता. शहर आणि जिल्ह्यातूनही बºयाच नावांची चर्चा झाली मात्र ऐनवेळी नवख्या उमेदवारांच्या गळ्यात माळ टाकण्यात आल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यापासूनची तयारी उमेदवारांना करावी लागली याचा फटका उमेदवारांना बसला. जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांची सभा ऐनवळी रद्द करण्यात आल्यामुळेदेखील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. वंचितकडून प्रचाराचे कोणतेही नियोजन दिसून आले नाही, उमेदवारांना आपापल्या कुवतीनुसार प्रचार करावा लागला. त्यानुसार त्यांना मतेही मिळाली. लोकसभेत वंचितने ज्याप्रमाणे वातावरण निर्मिती केली होती त्या तुलनेत विधानसभेत त्यांच्यात उत्साह दिसून आलाच नाही. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची भूमिकाही स्पष्ट नसल्यामुळे उमेदवारांना ऐनवेळी स्वबळावर लढावे लागले. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात वंचितला पाहिजे तेवढी चर्चा घडवून आणता आली नाही.

टॅग्स :Politicsराजकारण