शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भरधाव वाहनांना लागला ब्रेक

By admin | Updated: September 11, 2014 00:31 IST

दखल : निमोण चौफुलीवर गतिरोधकदर्शक फलक

गिरीश जोशी

मनमाडमनमाड - चांदवड रोडवर नेहमी वर्दळ असणाऱ्या निमोण चौफुलीवर गतिरोधक बसविण्यात आले असले तरी, गतिरोधक दर्शवणारे फलक नसल्याने भरधाव वेगातील वाहनांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत असत. याबाबत लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या ठिकाणी गतिरोधकदर्शक फलक बसविल्याने भरधाव वाहनांना ब्रेक लागला आहे.मनमाड - चांदवड महामार्गावर निमोण चौफुलीजवळ महाविद्यालयाजवळ रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी एसटी महामंडळाची भरधाव वेगात आलेली बस या गतिरोधकावरून आदळत गेल्याने बसच्या टपावर ठेवलेले टायर उदळून रस्त्यावर कोसळले. या चौफुलीवर महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच दरेगाव डोणगावकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सुदैवाने ही स्टेपनी खाली आदळली त्या वेळी कुठलेही दुचाकी वाहन किंवा पादचारी रस्त्याने जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या रस्त्यावर गतिरोधक असले तरी गतिरोधक दर्शक फलक लावण्यात आलेले नसल्याने भरधाव वेगातील वाहनचालकांना अंदाज येत नाही. गाडी अगदी गतिरोधकाजवळ आल्यानंतर गतिरोधक असल्याचे लक्षात येत असल्याने गाडीवर नियंत्रण करणे अशक्य होते. परिणामी भरधाव वेगात गाडी जात असल्याने लहान -मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण होत असे. या ठिकाणी फलक बसविण्यात यावे ही या भागातील रहिवाशांची मागणी होती. बसवरून स्टेपनी खाली आदळून झालेला अपघात गतिरोधकदर्शक फलक नसल्यामुळे झाला होता. याबाबत लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या रस्त्यावर गतिरोधकाच्या दोन्ही दिशेला मनमाड व चांदवडकडे गतिरोधक दर्शक फलक लावण्यात आले आहे.