शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख देऊनही भाजपाकडून उमेदवारी नाही

By admin | Updated: February 6, 2017 00:30 IST

आणखी एक व्हिडीओ व्हायरल : भाजपा नेत्यांची मात्र मनसेविरुद्ध पोलिसांत तक्रार

नाशिक : पक्षाची उमेदवारी देण्यासाठी दोन लाख रुपयांची इच्छुकांकडे मागणी करणाऱ्या भाजपाच्या शहर सरचिटणीसची ध्वनिचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल होऊन उडालेली खळबळ शांत होत नाही तोच, भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षानेदेखील दहा लाख रुपये देऊनही पक्षाने उमेदवारी न दिल्याचा आरोप करणारी नवीन ध्वनिचित्रफीत व्हायरल झाल्याने भाजपाचे नेतृत्व अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे दोन लाख रुपये पक्ष निधीसाठी मागितल्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदारासमक्षच हा आरोप झाल्याने आता त्याचे समर्थन कसे करावे? असा प्रश्न भाजपासमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे व्हिडीओत आरोप करणारे गोपाळ पाटील यांनी मात्र इन्कार केला असून, मनसेच्या नेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.भाजपाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयातच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहर सरचिटणीस नाना शिलेदार यांनी एका इच्छुकाकडे उमेदवारी हवी असेल तर दोन लाख रुपयांची मागणी केल्याची ध्वनिचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल झाली होती.  ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने उमेदवारी वाटप करताना बाजार मांडल्याची सर्वत्र टीका होऊ लागल्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र या पैसे मागण्याच्या कृतीचे समर्थन केले व सदरचे पैसे उमेदवारांच्या प्रचारासाठीच गोळा केले जात असल्याचे सांगितले होते. प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये अधिकृत घेतले गेल्याचे त्यांचे म्हणणे होते.  अर्थातच त्यांच्या या समर्थनाशी कोणी सहमत नसले तरी, भाजपाची उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले गेल्याच्या होणाऱ्या आरोपांना पृष्ठी देणारी दुसरी ध्वनीचित्रफित सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने भाजपासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.