शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंगद्वारे पर्यावरणाचा संदेश

By admin | Updated: October 2, 2015 22:38 IST

जनजागृती : भारतीय सायकल दिन साजरा करण्यासाठी चळवळ

नाशिक : महात्मा गांधींचे स्वावलंबन, स्वच्छता आणि पर्यावरण प्रेम हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या पर्यावरणप्रेमाचा विचार करून नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने इंडियन सायकल डे साजरा करावा असा आग्रह धरत असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे नाशिकमधील आमदार आणि महापौरांसह अन्य लोकप्रतिनिधींनी त्यात सहभागी होऊन चालना दिली.गंगापूरोडवरील डोंगरे मैदानावर सकाळी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते शुभारंभ झाला. आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवका अश्विनी बोरस्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधींच्या आवाहनाप्रमाणे सर्वांनी सायकल चालवून पर्यावरणाचे जतन करावे, असे आवाहन यावेळी नाशिक सायकलिस्टचे किरण चव्हाण यांनी केले. केवळ काही वेळासाठी नाही तर दैनंदिन सायकलींचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जसपालसिंग यांनी केले. महापौरांनीही सायकल चालवणे आरोग्यदायी असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनीषा रौंदळ यांनी व्यक्त केले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. गंगापूररोड मार्गे जेहान सर्कल, एबीबी सर्कल, त्र्यबंकरोड मार्गे ग्रीन व्ह्यू हॉटेल मार्गे परत ही रॅली डोंगरे मैदानावर नेण्यात आली. कार्यक्रमात दीपक बागड, राजेंद्र वानखेडे, विलास पाटील, महेश हिरे, अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)