शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:40 IST

आडगाव : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी त्या काळात कुटुंबाची मोठी धावपळ असते. त्यामधील महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नपत्रिकेचा.

ठळक मुद्देसामाजिक संदेश देणारी लग्नपत्रिका आडगाव परिसराचे आकर्षणस्वच्छ भारत अभियानाचा महात्मा गांधी यांचा चष्मा

आडगाव : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी त्या काळात कुटुंबाची मोठी धावपळ असते. त्यामधील महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नपत्रिकेचा. आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजजवळ वास्तव्यास असलेल्या सुदाम दुशिंग यांचा १२ मे रोजी शुभविवाह आहे. त्यांची सामाजिक संदेश देणारी लग्नपत्रिका आडगाव परिसराचे आकर्षण ठरत आहे. या विवाहसोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा अतिशय कल्पक असा प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका म्हटली की साधारणत: नातेवाइकांची भरमसाठ नावे असतात; पण नेहमीच्याच या पद्धतीला बगल देत कमी खर्चात पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका तयार करून एक सामाजिक आदर्श दुशिंग परिवाराने समाजासमोर ठेवला आहे.लग्नपत्रिकेमधील जागेचा वापर विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी करण्यात आला आहे. यात सर्वप्रथम श्री गणेश यांना वंदन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे संकेतचिन्ह, स्वच्छ भारत अभियानाचा महात्मा गांधी यांचा चष्मा असून, त्या चष्म्यामध्ये वर-वधूचे नाव देण्यात आले आहे. यात स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विवाह मुहूर्त, विवाहस्थळ हे दर्शविताना हिरवळीचा वापर करण्यात आला असून, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी टाकण्यात आल्या आहेत. याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा, हिरवळीद्वारे मानवाचे कल्याण होईल तसेच पर्यावरण रक्षण, प्रदूषण टाळण्याचा संदेश देण्यात आलाआहे. यासोबत रक्तदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पाण्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याबरोबर शेतीसाठी सूक्ष्म सिंचन करावे, पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याबरोबर मतदान आपला हक्क व कर्तव्य आहे असे महत्त्वपूर्ण ऐरणीचे मुद्दे असलेल्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.