शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांचा उत्साह शिगेला

By admin | Updated: September 15, 2016 00:26 IST

भक्तिमय सोहळा : मोरया...मोरयाचा गजर; रस्ते गर्दीने फुलले

नाशिक : शहरात बाप्पा विराजमान झाल्यानंतर वरुणराजांचे आगमन आणि गौरी तथा महालक्ष्मीच्यानिमित्ताने माहेरवाशिणींचा पाहुणचार तसेच शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांनी गणेश भक्तांमध्ये संचारलेला उत्साह बुधवारी शिगेला पोहोचला. गेल्या दहा दिवसांत अनेक कारणांनी गणपती दर्शन व देखावे पाहू न शकलेल्या गणेशभक्तांसह यंदाचा गणेशोत्सव डोळ्यांत साठवून अविस्मरणीय करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. शहरातील सर्व गणेश मंडळांमध्ये संध्याकाळच्या आरतीसाठी मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रविवार कारंजा, मेनरोड परिसर, भद्रकाली, गाडगे महाराज चौैक, शालिमार चौक , बी. डी. भालेकर मैदान, टिळकपथ, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, पेठरोड आदि भागात शहरवासीयांनी आरतीसाठी गर्दी केली. भक्तजनांनी केलेला मोरया... मोरया...चा गजर, अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध आणि आरतीच्या सुमधुर सुरांमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले. बाप्पाचे आगमन होऊन दहा दिवस उलटले असून नागरिकांनी गौरींना निरोप दिल्यानंतर दररोज जसा वेळ मिळेल तसे बाप्पांच्या दर्शनासोबतच देखावे पाहण्याचा आनंदही घेतला. दरम्यान, गेल्या दहा दिवसांत उत्साहाचे नियोजन आणि गर्दीचे नियंत्रण यात गुंतलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्सव निर्विघ्न पार पडल्याचे समाधान दिसत असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरणूकही निर्विघ्न पार पडावी यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. (प्रतिनिधी)