शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये उत्साह

By admin | Updated: February 20, 2017 00:31 IST

संकल्प : विचार करूनच मत देण्याचा निर्णय

नाशिक : महापालिकेच्या प्रचार तोफा थंडावल्या असून, सध्या मतदान करण्यासाठी नवमतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तरुण वर्ग आपल्या अमूल्य मतांबद्दल जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदाच मतदान करीत असलो तरी आम्ही उत्साहाच्या भरात कोणालाही मतदान करणार नाही. आमचे मत विचार करूनच देणार, असा संकल्प नाशिकच्या नवमतदारांनी केला आहे. त्यामुळे तरुणाईचे हे मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होत असून, गेल्या महिन्यापासून सुरू असलेला प्रचाराची रविवारी (दि.१९) संध्याकाळी ५ वाजता सांगता झाली आहे. आता गुप्त स्वरूपात उमेदवार मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. अशाप्रकारे गुप्त प्रचार करणाऱ्या उमेदवारांचे प्रामुख्याने नवीन मतदारांवर अधिक लक्ष आहे. त्यामुळे नवीन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवारांकडून होत आहे. त्यासाठी विविध प्रकारची प्रलोभनेही दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु, महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणवर्गाने आपला स्वाभिमान अबाधित राखण्याचा ठाम निश्चय केला असून, राज्यघटनेने दिलेल्या या अधिकाराचा पुरेपूर वापर करणार असल्याच्या प्रतिक्रिया पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळालेल्या नवमतदारांनी दिल्या आहेत. नवीन मतदारांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. या नवमतदारांच्या मतांवरही निवडणुकीचे चित्र पालटण्याची शक्यता  राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. (प्रतिनिधी)