शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

फ्यूनिक्युलर ट्रॉली सेवेत दाखल करा

By admin | Updated: May 15, 2017 00:41 IST

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर टॉलीची पाहणी करून भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचा आदेश पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कसप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील रेंगाळलेल्या फ्यूनिक्युलर टॉलीची पाहणी करून येत्या १ ते १५ आॅगस्ट दरम्यान भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचा आदेश पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. आज सप्तशृंगगडावर मंत्री जयकुमार रावल हे आदिमाया सप्तशृंगीचरणी हजेरी लावत नतमस्तक झाले.पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल हे आज सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर आले होते. यावेळी ग्रामपंचायत व सप्तशृंगी देवी न्यासाच्या वतीने मंत्रिमहोदयांचे स्वागत करण्यात आले. मंत्री रावल यांनी देवीची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी मुडेवार, भाजपाचे प्रदेश सदस्य विकास देशमुख, संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कळवणचे कार्यकारी अभियंता कांकरिया, उपअभियंता केदार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार आदी उपस्थित होते. देवीदर्शनानंतर गडावरील पर्यटन विकास विभागामार्फत झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामांची माहिती घेत, फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे बाकी असलेली तांत्रिक व प्रशासकीय कामे त्वरित पूर्ण करून १ ते १५ आॅगस्ट दरम्यान ट्रॉली भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुम्बा यांना दिले. तसेच सप्तशृंगगडावरील स्काय वॉक, रिंग रोडचे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्रामपंचायतीने पर्यटन विकास विभागांतर्गत भक्त निवास, व्यावसायिक गाळे व सुलभ शौचालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्रिमहोदयांनी शौचालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत गडावरील विविध विकासकामांबाबत मंत्रालयात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच सुमन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गणेश बर्डे, राजेश गवळी, ग्रामस्थ संदीप बेनके, मधुकर गवळी, दीपक जोरवर, गोविंद कोठावदे, दादा मोरे, सचिन सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष प्रकाश कडवे, उपतालुकाध्यक्ष विनायक दुबे, ग्रामविकास अधिकारी आर. बी. जाधव, विजय वाघ आदी उपस्थित होते.