शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचे बकालपण संपविणे आव्हानात्मक

By admin | Updated: July 2, 2017 00:44 IST

मालेगावचे बकालपण संपविणे आव्हानात्मक

मालेगाव : महापालिकेतील सत्तेचे सुकाणू काँग्रेस व शिवसेना या परस्पर विरोधकांच्या हाती आल्याची बाब तशी अनेकांच्या पचनी पडणारी नाहीच; पण तरी तसे घडले आहे खरे. त्यामुळे व्यापक जनहितासाठीच किंवा विकासासाठीच अशी राजकीयदृष्ट्या विजातीय ठरणारी आघाडी घडून आल्याचा समज करून घेत, नवीन पदाधिकाऱ्यांकडून जरा जास्तीच्या अपेक्षा केल्या जाणे गैर ठरू नये.राजकारणात काहीच अशक्य नसते, याची खात्री पटावी अशी ‘आघाडी’ मालेगाव महापालिकेत घडून आली आहे. निवडणुकीत कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामुळे या राजकीय सामीलकीकडे निव्वळ राजकारण म्हणून पाहिले जाणे स्वाभाविकही आहे. ‘त्रिशंकू’ निकालाच्या परिणामी आकारास येणाऱ्या अशा समीकरणांमुळे सत्तेचे शकट हाकणे जिकिरीचे वा कसरतीचेच ठरते, असाच आजवरचा अनुभव आहे. परंतु कधी कधी, अनपेक्षित घटनांतूनही अपेक्षित कामे घडून येत असल्याचे पाहता, या घटनेकडेदेखील सकारात्मकतेने बघायला हरकत नसावी. अशी सकारात्मकता येथे यासाठीही ठेवता येणारी आहे की, काँग्रेस व शिवसेना पक्षाचे म्हणून नव्हे, तर मालेगावच्या समस्यांची पुरेपूर जाण व पालिका कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींकडे नेतृत्वाची सूत्रे आली आहेत. महापौरपदी निवड झालेल्या रशीद शेख यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच नगरसेवकापासून झाली होती. नंतर त्यांनी विधिमंडळातही मालेगावचे प्रतिनिधित्व केले, आता पुन्हा नगरसेवक ते महापौर बनून त्यांनी राजकीय वर्तुळ पूर्ण केले आहे. उपमहापौर सखाराम घोडके दोनदा स्वीकृत व सहावेळा निवडून आलेले आहेत. या वाटचालीत त्यांनी एकदा नगराध्यक्ष, तीन वेळा उपनगराध्यक्ष पद व आता दुसऱ्यांदा उपमहापौरपद मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कामकाजाचा दांडगा अनुभव आहे, म्हणूनच या दोघांच्या राजकीय व कामकाजाच्या अनुभवाचा लाभ होणे अपेक्षित आहे. यात आणखी एक जमेची बाजू अशीही आहे की, महापौर शेख रशीद हे स्वत: माजी आमदार आहेतच शिवाय विद्यमान अवस्थेत त्यांचेच पुत्र आसिफ शेख आमदार आहेत, तर सखाराम घोडके यांचे स्थानिक पक्षीय नेते दादा भुसे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे भिन्न पक्षीय असले, तरी शेख व घोडके या दोघांना शासन स्तरावरून काही योजना वा मदत मिळवून आणणे तसे अवघड ठरणार नाही. गरज आहे ती इच्छाशक्तीची. या नवीन पदाधिकाऱ्यांकडे पालिकेची सूत्रे येऊन अवघा पंधरवडाच उलटला आहे. सध्या त्यांना स्थायी समितीच्या निवडीचे वेध लागले आहेत. तेथेही त्यांच्या मनाप्रमाणेच होण्याची चिन्हे आहेत. ती निवड एकदाची झाल्यावर खऱ्या अर्थाने त्यांचा परीक्षाकाळ सुरू होईल. दरम्यान, राज्यमंत्री भुसे यांनी पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेत आजवर चालत आलेली ‘ठेकेदारी’ मोडून काढण्याचे संकेत दिले आहेत. मालेगावचे बकालपण कायम टिकून राहण्यात या ठेकेदारीचाच अडसर राहिला आहे. अधिकतर नगरसेवकांमध्येच घुटमळलेली ठेकेदारी खरेच संपुष्टात आणली गेली तर मालेगावात विकासाच्या पाऊलखुणा उमटविणे शक्य आहे. तेव्हा, ‘विजातीय’ राजकीय प्रवाहातील असले तरी, शेख व घोडके यांच्या राजकीय मातब्बरीतून मालेगावचे बकालपण दूर होऊन, एक नवा चेहरा घेऊन हे शहर उभे राहिलेले दिसून येण्याची अपेक्षा आहे.