शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक साखर कारखाना कार्यस्थळावर रहिवाशांचा घेराव

By admin | Updated: June 26, 2014 00:47 IST

नाशिक साखर कारखाना कार्यस्थळावर रहिवाशांचा घेराव

 

पळसे : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाचा गेल्या सव्वा महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संतप्त रहिवाशांनी आज नासाकाचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना घेराव घालुन धारेवर धरले होते.नाशिक साखर कारखाना व कर्मचारी वसाहत येथील वीजेचे बिल कारखाना प्रशासनाने न भरल्याने सव्वा महिन्यापूर्वी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे कारखान्यात सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने कारखान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये वीजच नसल्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याकरिता रहिवाशांना वणवण करावी लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सर्वाधिक जास्त त्रास सहन करावा लागत आहे. सव्वा महिना होऊनही नासाका संचालक मंडळ व प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. रहिवाशांचा उद्रेकनासाका प्रशासन वीज बिल भरण्याबाबत किंवा वीजपुरवठा सुरळीत सुरू होण्याबाबत कुठलीही तजवीज करीत नसल्याने रहिवाशांचा आज उद्रेक झाला. संतप्त रहिवासी, महिलांनी आज सकाळी ९ वाजता नासाका मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना घेराव घालुन आमची पाण्याची व विजेची त्वरित व्यवस्था करावी अन्यथा आम्ही तुम्हाला येथून जाऊ देणार नाही अशी कठोर भूमिका घेत घेराव घातला. संतप्त रहिवाशांनी जवळपास दीड तास मोठे यांना एकाच ठिकाणी बसवुन प्रश्नांचा भडीमार करत सहन करत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली. यावेळी मोठे यांनी येत्या दोन दिवसात मार्ग काढुन कोणत्याही परिस्थितीत वीज व पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी घेराव आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)