शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये साडेतीनशे धार्मिक स्थळांची अतिक्रमणे

By admin | Updated: January 11, 2015 00:13 IST

कारवाईचा प्रश्न : तणावामुळे महापालिकेची तलवार म्यान

नाशिक : शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी महापालिकेने अगोदरच या संदर्भात माहिती संकलित केली आहे. शहरात सुमारे साडेतीनशे विविध धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे आहेत; परंतु ती पाडायची कशी असा प्रश्न पालिकेसमोर आहे. तथापि, आता न्यायालयानेच आदेश दिल्याने पालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.कोणत्याही प्रकारची बांधकामे करताना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु शहरात धार्मिक स्थळे बांधकाम करताना मात्र कोणत्याही प्रकारे बांधकामे करता येत नाही. त्यासंदर्भात भगवानजी रियानी यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केल्यानंतर यासंदर्भात सुनावणी झाली. आता चार आठवड्यांत राज्यातील सर्व शहरात पदपथांच्या किनाऱ्यावर असलेली धार्मिक अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे आता कारवाई अटळ मानली जात आहे. राज्यशासनाने धार्मिक अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी आदेश दिले होते. त्यानुसार शहरी भागात महापालिका आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. नाशिक महापालिकेत आयुक्तपदी भास्कर सानप असताना समिती गठीत करण्यात आली. यात पोलीस आयुक्त, नगररचना अधिकारी तसेच अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. महापालिकेने त्याचवेळी १९९५ पूर्वीची अनधिकृत धार्मिक अतिक्रमणे आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेली अतिक्रमणे वा अनधिकृत बांधकामे यांची यादीच तयार केली होती. त्यानुसार सर्वधर्मीयांची मिळून सुमारे साडेतीनशे धार्मिक अतिक्रमणे असल्याची माहिती नगरचना विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अतिक्रमणांचा सर्व्हे झाला; परंतु त्यानंतर मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कारवाई केल्यास धार्मिक भावना दुखावतील, त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो या भीतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते. तथापि, आता न्यायालयाने चार आठवड्यात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महापालिकेला अद्याप आदेश प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)