शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘इमू’ फसवणूक; संशयितांच्या मालमत्तेचा शोध सुरू

By admin | Updated: October 8, 2015 00:14 IST

‘इमू’ फसवणूक; संशयितांच्या मालमत्तेचा शोध सुरू

नाशिक : फायदेशीर गुंतवणूक व दुप्पट परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘इमू’ कंपनीतील पाच संशयितांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे़ या संशयितांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या मालमत्तेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़२०११ मध्ये इंडियन इमू लाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने इमू पक्षिपालन व्यवसायासाठी गुंतवणूकदारांना फायदेशीर गुंतवणूक व दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून प्रमुख संशयित हरिष दीक्षित व त्याच्या सहकाऱ्यांनी शेतकरी तसेच गुंतवणूकदारांची कोट्यवधी रु पयांची फसवणूक केली़ या प्रकरणी संशयित राजेंद्र रामराव निकम (रा. पेठरोड), संतोष गोविंद मैंद (रा. जेलरोड), राजेंद्र आनंदा राऊत (रा. मनमाड) व दीपक वसंत पवार (रा. नाशिक) यांना सोमवारी तर पाचवा संशयित गंगाधर गणपत जाणराव (रा. भगूर) यास मंगळवारी अटक केली होती़ या सर्वांना न्यायालयाने १५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे पाचही संशयित इमू कंपनीचे एजंट म्हणून काम करत होते. जमा केलेली रक्कम कंपनीकडे न भरता परस्पर विल्हेवाट लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक व त्यामधून जमा केलेली माया, फरार संशयित हरिष दीक्षितशी असलेला संपर्क व्यवहार अशी माहिती त्यांच्याकडून पोलीस मिळवित आहेत़