शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन अत्याचारप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: January 18, 2017 16:06 IST

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सुनील पंडीत गांगुर्डेला दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 18 - कळवण तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सुनील गांगुर्डेला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरूण ढवळे यांनी बुधवारी  दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 25 दिवसांच्या कारावासाचीही शिक्षा सुनावली आहे. एप्रिल 2015 मध्ये कळवणजवळ ही घटना घडली होती़.
 
कळवण तालुक्यातील एक अल्पवयीन युवती महाविद्यालयीन शिक्षणासाठी बसने ये-जा करत होती.  एप्रिल 2015 मध्ये आरोपी गांगुर्डे याने या युवतीशी ओळख वाढवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. यानंतर या युवतीला कळवणमधील एका स्त्री रोग तज्ज्ञाकडे नेऊन उपचार केले. या प्रकरणी पीडित युवतीने कळवण पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गांगुर्डेविरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) तसेच बलात्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
पीडित अल्पवयीन मुलीची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता. ती बारा ते चौदा आठवड्यांची गर्भवती असल्याचे तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. या खटल्यात सरकारी वकील विद्या जाधव यांनी गांगुर्डेविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. या पुराव्यानुसार जिल्हा न्यायाधीश ढवळे यांनी गांगुर्डे यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.