नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती सुरूच असून, पक्षाचे इंदिरानगर परिसरातील नगरसेवक सतीश सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. जानेवारीत आणखी काही नगरसेवक भाजपात जाणार असल्याचे वृत्त आहे.महापौरपदाच्या निवडणुकीत नीलेश शेलार आणि शोभना शिंदे या दोन नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असतानाच मनसेत नाराजीनामा सुरू झाला आणि माजी आमदार प्रदेश सरचिटणीस वसंत गिते यांच्यासह अन्य अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला राम राम ठोकला. त्यानंतर गितेंसह राज्यातील अनेक नाराज नेते मनसेतून भाजपात जाण्यासाठी जानेवारी महिन्याचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. त्यामुळे अशा नाराज नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना दूरध्वनी केले जात आहेत. अशा स्थितीत पक्षातील असेच नाराज नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सिडको येथील भाजपा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपात प्रवेश केला.
ंमनसेला गळती सुरूच; एक नगरसेवक भाजपात
By admin | Updated: December 27, 2014 01:00 IST