शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेने वीजतारा तुटल्या नागडे गाववासीय अद्याप अंधारात

By admin | Updated: May 18, 2014 23:52 IST

येवला : नागडे-कोटमगाव रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे वाहनाच्या धडकेने पोल व तारा तुटल्याने या परिसरातील शेतकरी विजेअभावी अंधारात आहेत. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.

येवला : नागडे-कोटमगाव रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे वाहनाच्या धडकेने पोल व तारा तुटल्याने या परिसरातील शेतकरी विजेअभावी अंधारात आहेत. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर येवला-कोटमगाव रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम चालू आहे. यामुळे औरंगाबादकडून येणारी वाहतूक नागडे गावामार्गे वळविण्यात आली आहे. वाहनाच्या धडकेमुळे नागडे-कोटमगाव रस्त्यादरम्यान इलेक्ट्रिकचा पोल आणि विजेच्या तारादेखील तुटल्या आहेत. यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांची वीज खंडित झाली आहे. येथील ग्रामस्थ हरिश्चंद्र काळे, लक्ष्मण साताळकर, अशोक थोरात, देवीदास साताळकर यांच्यासह १५ शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीला या संबंधाने वारंवार तोंडी वीजजोडणी पूर्ववत करण्याची मागणी केली. अखेर लेखी निवेदनाद्वारे रास्ता रोकोचाही इशारा दिला आहे.शेतकर्‍यांनी वीजदेयके भरल्याशिवाय डी.पी.च्या कामासह वीजजोडणी पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनी येत नाही. आता तर वाहनाच्या धडकेने विजेच्या तारा व पोल तुटला आहे. तरीही तत्पर वीजजोडणी पूर्ववत करण्यास वीज वितरण कंपनी पुढाकार घेत नाही. गेल्या महिनाभरापासून या परिसरात चार डी.पी. बंद आहेत. शेतकरी मदतीला तयार असतात तरीही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अनास्था का दाखवतात असा सवाल या परिसरातील विजेअभावी त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी केला आहे.उड्डाणपुलामुळे नागडेमार्गे मोठी वाहतूक औरंगाबादकडून ये-जा करीत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुतर्फा कमालीचा वाहतुकीचा ताण पडत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळा सुरू होण्याअगोदर साइडप˜ीचे काम करून त्यावर भराव घालावा. आवश्यक तेथे रस्ता रुंद करावा, अन्यथा रस्ता खचला तर वाहतुकीत मोठा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बा‘वळण रस्त्यावरील प्रमुख तार वळणांवरचा रस्तादेखील रुंद करण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी एकदम अरुंद असलेल्या या रस्त्यावरून दोन्ही वाहने, समोरासमोर आल्यानंतर मार्ग काढणेदेखील अवघड होते.