शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मोसमसह करंजाळीत विजेचा लपंडाव

By admin | Updated: December 26, 2016 02:05 IST

शेतकरी त्रस्त : वीजवितरण कंपनीचे आडमुठे धोरण

 द्याने : वीज वितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे मोसमसह करंजाळी खोऱ्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच परिसरात अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा जमिनीपर्यंत झुलत आहेत. शेतकरी व नागरिक वीज कनेक्शन घेण्याची तयारी दर्शवित असतानादेखील तांत्रिक अडचणी दाखवून वेळ मारून नेत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त मोसम व करंजाळी खोऱ्यातील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान करंजाळी येथील वीज महावितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.करंजाळी खोऱ्यातील निताणे, भुयाणे, बिजोटे, आखतवाडे, करंजाड, पारनेर मोसम परिसरातील आसखेडा, वाघळे, उत्राणे, राजपूरपांडे, द्याने आदि गावांमध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्येने ग्रासल्याने शेतकरी वैतागले आहेत. आली रे...आली, गेली रे...गेली या डोंबारी खेळामुळे बळीराजाचा मेळ काही बसत नसल्याचे सध्या चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामपूर येथील वरिष्ठ अभियंता चरणसिंग इंगळे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर शेतात राहणारे शेतकरी विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहेत. बल्ब आहे पण प्रकाश नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करंजाळी व आसखेडा येथील कनिष्ठ अभियंत्यांना अनेक वेळेला शेतकऱ्यांनी भेटी घेऊन परिस्थिती सांगितली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भामरे यांनी पुन्हा एकदा मोसम परिसरातील सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे हे ग्राहकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने करंजाळी, पारनेर, निताणे, भुयाणे, बिजोटे, उत्राणे, द्याने, आखतवाडे आदि गावांतील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच राजोळे यांची उचलबांगडी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.