शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सभापतिपदाची निवडणूक अटळ

By admin | Updated: April 2, 2017 00:56 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक ५ एप्रिलला होत असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक ५ एप्रिलला होत असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. शिवसेना-कॉँग्रेस युती आणि भाजपा-राष्ट्रवादी आघाडी दोन्ही बाजूने सभापतिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.शनिवारी दिवसभरात शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तसेच नेत्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावत वेगवेगळ्या चर्चा केल्याने विषय समिती सभापती निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांच्याशी जिल्हा परिषदेच्या आवारात काही काळ गुफ्तगू केल्याने शिवसेना- राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. त्याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य धनराज महाले यांनीही जिल्हा परिषदेत काही काळ हजेरी लावत पुढील राजकीय गणिते जुळविण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. तिकडे कॉँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. अनिलकुमार अहेर व कॉँग्रेसचे गटनेते यशवंत गवळी यांनीही उपाध्यक्ष नयना गावित यांच्या कक्षात बसून काही काळ चर्चा केली. शिवसेना-कॉँग्रेस-माकप बंडखोर व अपक्ष या युतीमध्ये पदांचे वाटप करण्यावरून घोडे अडल्याचे समजते. शिवसेनेला आधी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या कॉँग्रेसने आता एका सभापतिपदासाठी हट्ट धरल्याने कॉँग्रेस, माकप व अपक्षांना सोडून थेट राष्ट्रवादी कॉँग्रेसलाच सोेबत घेण्याचा एक मतप्रवाह शिवसेनेत जोर धरू लागला आहे. त्यातच सभापतिपदांचे वाटप करताना सामाजिक समीकरणेही जपण्याची वेळ युतीवर आल्याची चर्चा आहे. शिवसेना-कॉँग्रेसचे सदस्य रविवारी (दि.२) सहलीला बाहेर पडण्याची शक्यता आहे. तर भाजपा-राष्ट्रवादीचे सदस्य एकत्रित सोमवारी (दि.३) नाशिकच्या जवळपास सहलीला जाण्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)