शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात आठ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: February 6, 2017 00:03 IST

अनेकांचे लक्ष : लोहोणेर, वाखारी गट अद्याप निरंक

देवळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रविवारपर्यंत आठ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून यापैकी गटासाठी चार, तर गणासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहायक निवडणूकनिर्णय अधिकारी कैलास पवार यांनी दिली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या लोहोणेर व वाखारी गटात अद्यापपर्यंत एकही नामांकनपत्र दाखल झालेले नाही.  आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची चांगलीच कसोटी लागत असून कागदपत्रांची जमवाजमव करताना धावपळ करावी लागत आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार पवार यांनी नोटरी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांना थोडाफार दिलासा मिळाला. इच्छुक उमेदवार आज नामांकनपत्र दाखल करण्यापूर्वी पक्षाच्या एबी फॉर्मची प्रतीक्षा करताना दिसत होते. परंतु राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले नाहीत.  सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करताना कमालीची गोपनीयता पाळताना दिसत आहेत. उमेदवारांची नावे लवकर जाहीर केल्यास विरोधी पक्षाला व्युहरचना बदलण्यास वाव मिळू नये, असा उद्देश त्यामागे दिसत आहे. यामुळे इच्छुक उमेदवार तिकीट आपल्यालाच मिळणार असा ठामपणे दावा करताना दिसत असले तरी तिकीटाची शाश्वती वाटत नसल्यामुळे एका जागेसाठी दोन ते तीन नामांकनपत्र दाखल करतांना दिसत आहेत. आहेत. उमराणे गटात तीन उमेदवारांनी चार नामांकनपत्र दाखल केले आहेत. श्रावण थोरात, सोमनाथ पवार यांच्या अर्जासह भाऊराव अहिरे यांनी दोन नामांकनपत्र दाखल केली आहेत.  दहीवड गणात ललिता केदा शिरसाठ यांचा एक अर्ज असून, सविता देवरे यांनी तीन नामांकनपत्र दाखल केले आहेत. महालपाटणे गणात अरु ण अहिरे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून, शिवाजी अहिरे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. लोहोणेर गणात विमलबाई शेवाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आतापर्यंत आलेला आहे. (वार्ताहर)