शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

...यंदाही ईदगाह मैदान राहणार सुने-सुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

--- नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान व सर्वात मोठा सण रमजान ईदवर (ईद-उल-फित्र) मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ...

---

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान व सर्वात मोठा सण रमजान ईदवर (ईद-उल-फित्र) मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर सावट आहे. जिल्ह्यात उद्यापासून पुढील दहा दिवसांचा कडक लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. यामुळे यावर्षीही शहरातील शहाजहाँनी इदगाह मैदान सुने-सुने राहणार आहे. येत्या शुक्रवारी ईद साजरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रमजान ईद, बकरी ईद हे दोन प्रमुख सण मुस्लीम बांधवांचे सर्वात मोठे सण म्हणून ओळखले जातात. या सणाच्या दिवशी धार्मिक परंपरेनुसार व धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार सामुदायिकरित्या खुल्या आकाशाखाली अर्थात इदगाह मैदानावर नमाज पठण केले जाते. त्यामुळे या सणाच्या दिवशी समाजबांधवांनी इदगाह मैदान गजबजलेले असते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी कोरोनाची साथ तेजीत असून, संसर्ग शहरासह ग्रामीण भागातसुद्धा अधिक फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिनाभरापासून सर्व धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली आहेत. येत्या बुधवारपासून नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे यंदा समाजबांधवांना ईदची नमाज आपापल्या घरांमध्येच पठण करावी लागणार असल्याचे दिसते.

----इन्फो---

बुधवारी चंद्रदर्शनाची शक्यता

रमजान पर्वचे २७ उपवास पूर्ण झाले असून, येत्या बुधवारी उद्या संध्याकाळी २९ उपवास पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही प्राप्त झाल्यास शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्याकडून ईद साजरी करण्याबाबतची घोषणा करण्यात येईल. चंद्रदर्शन घडले नाही तर गुरुवारचा तिसावा उपवास पूर्ण करून शुक्रवारी रमजान ईद साजरी केली जाईल.

-----इन्फो---

''ईद''ची खरेदी रद्द; गरजूंना मदतीचा हात

कोरोनाचे संकट बघता समाजबांधवांनी यावर्षीही ईदची खरेदी पुढे ढकलली आहे. बाजारपेठा बंद असल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंसाठी राबणाऱ्या विविध संस्थांचे हात बळकट करण्यासाठी समाजबांधव प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. महिनाभरापासून कोरोनाची तीव्र झालेली साथ, रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता ''जकात'', ''फित्रा''च्या माध्यमातून समाजातील धनिक वर्ग गोरगरीब कुटुंबांपर्यंत आर्थिक स्वरूपात दान तसेच धान्यदान पोहोच करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश सामाजिक सेवाभावी संस्थांनी अशा कुटुंबांचा शोध घेत ''रमजान किट'' अर्थात शिरखुर्मासाठी लागणारा सुका मेवा, किराणा वस्तू पुरविण्यास सुरुवात केली आहे.