शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनावर पारंपरिक औषधांनीही प्रभावी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

शहरात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी मुळातच दक्षता घ्यावी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासह संसर्ग हेाऊ नये यासाठी महापौर सतीश ...

शहरात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी मुळातच दक्षता घ्यावी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासह संसर्ग हेाऊ नये यासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या उपचार पद्धतीचे पालन करावे यासाठी आग्रही असून त्या संदर्भात गुरुवारी तज्ज्ञांसमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ही माहिती तज्ज्ञांनी दिली. कोरोना संसर्ग झाल्यानंतर बेड मिळण्यापासून औषध आणि उपचाराच्या अनेक समस्या उदभवतात. त्यातही महापालिकेसारखी यंत्रणा संपूर्ण क्षमतेनिशी झटत असली तरी त्यांनाही मर्यादा आहेत; त्यामुळेच संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले.

मुळात कोणत्याही चिकित्सा प्रणालीशी कोणाचीही स्पर्धा नाही. मात्र सहजसुलभ पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि उपचाराचे प्रयत्न असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. सचिन पाटील यांनी पतंजलीविषयी असलेल्या गैरसमजांचे खंडन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.

कोट..

कोरोना संसर्ग झाला की लगेचच रुग्णाला घाबरवून सोडल्यास त्याच्यावरील तणाव वाढतो. त्याचा श्वसनावर तसेच फुप्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे न घाबरता परिस्थितीला सामोरे जा. हेामिओपॅथीतदेखील कोरोनावर उपचार करता येतात; तसेच त्यातून रुग्णदेखील बरे हेातात. गेल्या वर्षी असेर्निक अल्बमच्या गोळ्या लाखो लोकांनी घेतल्या. त्यांनादेखील त्याचा फायदा झाला.

- डॉ. आशर शेख, होमिओपॅथी तज्ज्ञ

कोट...

पूर्वदक्षता (प्रिव्हेंशन), हायरिस्क, कोविड पॉझिटिव्ह आणि पोस्ट कोविड असे या संदर्भातील चार टप्पे आहेत. होमिओपॅथीत त्याचे उपचार असून त्यातील डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेतल्यानंतर फुप्फुसातील संसर्ग कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ९८ टक्के प्रकरणांत रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेऊन रुग्ण बरा हेाऊ शकतो.

- डॉ. योगेश धोंगडे, होमिओपॅथी तज्ज्ञ

कोट...

उन्हाळा असल्याने थंड पदार्थांकडे ओढा असला तरी आइस्क्रीम, शीतपेये यासारख्या पदार्थांमुळे घशात अत्यंत थंड होते आणि ते कोराेनासारख्या विषाणूला पोषक ठरते; त्यामुळे या काळात फ्रिज डिस्टन्सिंगदेखील केले पाहिजे. जलनेती नियमित केल्यास संसर्ग टळू शकतो. त्यामुळे ती नियमितपणे केली पाहिजे.

- डॉ. अभिनव मुठे, आयुर्वेदाचार्य

कोट...

काेरोना उपचाराबद्दल माझे संशोधन झाले आहे. संसर्ग झाल्यानंतर ताप आल्यास तो तत्काळ कमी होण्यासाठी गोळ्या-औषधे घेतली जातात. तसे न करता तापाचे सुयोग्य नियमन केले पाहिजे. होमिओपॅथीत हेच केले जाते. अत्यंत साध्या उपचाराने कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे.

- डॉ. फराज मोतीवाला, होमिओपॅथ तज्ज्ञ

कोट...

सदोष श्वसन हे खरे आजाराचे मूळ असून त्यामुळे फुप्फुसाचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे योग्य श्वसनाबरोबरच प्राणायाम आणि कपालभाती नियमित करणे आवश्यक आहे.

- राज सिन्नरकर, योगतज्ज्ञ