शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

आधुनिक तंत्रज्ञानानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

नाशिक : शिक्षण संस्थांनी आधुनिक काळातील उद्योगांची गरज आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे ...

नाशिक : शिक्षण संस्थांनी आधुनिक काळातील उद्योगांची गरज आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तसेच मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण करण्यासोबतच कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे गुरुवारी (दि. १) शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. कर्मवीरांना मविप्र संस्थेने रचलेला पाया अधिक भक्कमपणे पुढे नेण्यासाठी संस्थेमार्फत आधुनिक शिक्षण पध्दतीची कास धरावी, असा सल्ला देतानाच नवीन इमारती पर्यावरणपूरक तयार होण्याची गरज व्यक्त केली. तसेच संस्थेला ५ कोटीची मदत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मनुवाद आजही संपलेला नाही. वेगवेगळ्या मार्गाने तो आजही काम करत आहे. अशा परिस्थितीत बहुजनांच्या शिक्षणासाठी सावधगिरीने पाऊल टाकण्याची गरज असल्याचे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, शरद पवार यांचे संस्थेसाठी मोठे योगदान असून, त्यांचे नाव आर्किटेक्चर महाविद्यालयास दिल्याने महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वाढल्याचे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रास्ताविकात नमूद केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बनकर, सीमा हिरे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले आदी उपस्थित होते. मविप्रच्या सरचिटणीस निलीम पवार यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आभार मानले आहे.

010721\01nsk_23_01072021_13.jpg

राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या नूतन इमारतीचे उदघाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, समवेत पालकमंत्री छगन भूजबळ, मविप्रच्या सरचिटणीस  निलिमा पवार, अध्यक्ष तुषार शेवाळे आदी