शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समिती निवडणूक; शासनाने अहवाल मागविला

By admin | Updated: September 20, 2016 01:24 IST

महापालिका : मुदत संपल्याबाबतची तक्रार

नाशिक : महापालिका शिक्षण समितीच्या सभापती - उपसभापतिपदाचा कालावधी एक वर्षाचा संपूनही निवडणूक घेतली जात नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने त्यासंबंधी शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. परंतु, त्यात स्पष्टता होत नसल्याने शासनानेच आता महापालिकेकडे समितीच्या निवडणुकीबाबतचा सविस्तर अहवाल मागविला आहे.सन २०१४ मध्ये राज्य शासनाने महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करण्याची कार्यवाही केली होती. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार नव्याने शिक्षण समिती गठीत करण्यात आली आणि समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठीही निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, सभापती-उपसभापतिपदाचा वर्षभराचा कार्यकाल संपुष्टात येऊनही नगरसचिव विभागाने त्यासाठी निवडणूक प्रक्रिया न राबविल्याने त्याबद्दलचा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते संदीप भवर यांनी एका पत्रान्वये घेतला होता. भंवर यांनी त्याबाबतचे पत्रही शासनाला पाठविले होते. भवर यांच्या आक्षेपानंतर नगरसचिव विभागाने समितीच्या कार्यकालाबाबत शासननिर्णयाची माहिती महासभेत मांडली होती, परंतु महासभेने या माहितीला बेदखल केले होते. शिवाय, महासभेने अडीच वर्षांचा कालावधी निश्चित केलेला असल्याचेही त्यावेळी समिती सभापती संजय चव्हाण यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, नगरसचिव विभागाने याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडे मागविले होते. परंतु महापालिकेच्या पत्रात कोणते मार्गदर्शन हवे अथवा कशासाठी आदेश अभिप्रेत आहे, याचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने शासनाने पुन्हा एकदा सुस्पष्ट अहवाल महापालिकेकडून मागविला आहे. (प्रतिनिधी)