नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद सुरू असतानाच नाशिककरांची ऐन दिवाळीच्या सणासुदीत गैरसोय होऊ नये याकरिता आठवड्यापुरता पाणीकपात शिथिल करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला दिले.पाणीप्रश्नी बोलाविण्यात आलेल्या विशेष महासभेत महापौरांनी याबाबतचे आदेश दिले. गंगापूर धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याचा वापर शेती आणि मद्य कारखान्यासाठी केला जात आहे. तेथील शेतकरी व उद्योजकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असताना नाशिककरांच्या चेहऱ्यावर मात्र ऐन सणासुदीत पाणीकपातीची चिंता आहे. महापालिकेने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन दि. ९ आॅक्टोबरपासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता दिवाळी सणाच्या एका आठवड्यापुरता शहरात पाणीकपात शिथिल करण्याचे आदेश महापौरांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांना दिले.
दिवाळीच्या काळात पाणीकपात शिथिल
By admin | Updated: November 7, 2015 23:52 IST